ऐतिहासिक वास्तूंचे जतन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:56+5:302021-07-03T04:18:56+5:30

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील अनेक ऐतिहासिक ...

Preserve historic buildings | ऐतिहासिक वास्तूंचे जतन करा

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करा

Next

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत. त्याचे जतन होईल. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल.

काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क

घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव - गोंडपिपरी, नवेगाव मोरे- पोंभूर्णा, पोंभूर्णा- मूल, पोंभूर्णा- चंद्रपूर, पोंभूर्णा- आक्सापूर- गोंडपिपरी मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे.

केरोसिनअभावी अडचण वाढली

जिवती : केरोसिनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसिन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसिन पुरविण्याची मागणी आहे.

येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा

कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले

पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. यंदाही मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.

माणिकगड परिसरात पर्यटन सफारी सुरू करा

कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वनविभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. असे झाले तर परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे.

चंद्रपूर-वणी मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवा

घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मद्यपीकडून विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. परंतु, तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. आता तर पोलीस गस्त घालत असल्याची माहितीही तस्करांना मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी

कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोईचे होणार आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Preserve historic buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.