आज ठरणार बार असोशिएशनचा अध्यक्ष ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:31 AM2021-09-22T04:31:19+5:302021-09-22T04:31:19+5:30

मंगल जीवने बल्लारपूर : दर दोन वर्षांनी होणारी निवडणूक कोरोना संकटामुळे लांबून तीन वर्षांनंतर होत आहे. यंदा चंद्रपूर बार ...

President of the Bar Association today? | आज ठरणार बार असोशिएशनचा अध्यक्ष ?

आज ठरणार बार असोशिएशनचा अध्यक्ष ?

Next

मंगल जीवने

बल्लारपूर : दर दोन वर्षांनी होणारी निवडणूक कोरोना संकटामुळे लांबून तीन वर्षांनंतर होत आहे. यंदा चंद्रपूर बार असोशिएशनची २५ वी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या संधीचा फायदा नवोदित वकील मंडळी घेत आहे. दुसरीकडे महत्वपूर्ण बैठकीत घेतलेल्या वकिलांचा निर्णय हा आजच्या निवडणुकीत महत्वाचा मानल्या जात आहे. यंदाची ही निवडणूक खुर्चीसाठी गाजणार आहे. बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत बार असोसिएशनचा अध्यक्ष कोण बनणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या बार असोशिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड.अभय पाचपोर, ॲड.फरहत बेग,व ॲड.जोत्स्ना मेश्राम हे तीन उमेदवार आहेत. परंतु खरी चुरस ॲड. बेग व ॲड. पाचपोर यांच्यात आहे आणि यासाठी दोन्ही वकिलांच्या पॅनलने दिवसरात्र मेहनत घेतली आहे. याशिवाय उपाध्यक्षपदासाठी राजेश ठाकूर, सुरेश तालेवार,सचिव पदासाठी आशिष धर्मपुरीवार, महेंद्र असरेट, सहसचिव पदाकरिता राजेश कार्लेकर विनायक कार्लेकर, कोषाध्यक्ष पदाकरिता राजेंद्र झुलकनटीवार,सचिन करमरकर,सुनील मून,ग्रंथपाल पदाकरिता जितेंद्र शर्मा, केनाल सरोजकर उभे आहेत. याशिवाय कार्यकारिणी सदस्यांच्या १२ जागांसाठी पुरुष वकिलांमधून १७ व महिलांमधून ८ उमेदवार उभे आहेत. निवडणुकीत १८ पदासाठी उभे राहणाऱ्या सर्व वकिलांचे भाग्य ६१८ वकिल सदस्य ठरवणार आहे.

बॉक्स

निवडणुकीचा मागोवा

चंद्रपूर बार असोशिएशनच्या सन १९८७ साली झालेल्या निवडणुकीत ॲड.भ. सो. खनके यांनी ॲड. के. रामराव यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर १९८९ साली पुन्हा अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले खनके यांना ॲड. दादासाहेब देशकर यांनी हरवून अध्यक्षपद मिळविले. त्यानंतर २००१ सालच्या निवडणुकीत ॲड.चंद्रकांत देशमुख यांचा पराभव करून ॲड.दत्ता हजारे यांनी अध्यक्षपद भूषविले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची दिसत आहे. असे असले तरी निवडून आल्यानंतर आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिला आहे.

कोटसन १९०० च्या पहिल्या दशकापासून वकिलांची संघटना अस्तित्वात होती. आधी या संघटनेचे ज्येष्ठ सदस्य हे त्यांचे ज्येष्ठतेनुसार अध्यक्ष असायचे. परंतु १९५२ साली चांदा बार असोशिएशनने लिखित घटना तयार करून घेतली व तेव्हापासून पंजिबद्ध संघटना अस्तित्वात आली.

-ॲड.आर.एम.घोडेस्वार, ज्येष्ठ वकील.चंद्रपूर.

Web Title: President of the Bar Association today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.