भूमिपुत्राच्या कार्याला राष्ट्रपती पदकाची मोहर

By admin | Published: January 26, 2017 01:30 AM2017-01-26T01:30:29+5:302017-01-26T01:30:29+5:30

चिमूर क्रांतीभुमिपासून ११ किलो मिटर अंतरावर असलेल्या नेरी येथे लहानपणापासून बाळकडू घेत

President's Medal Stamp to the Work of the People | भूमिपुत्राच्या कार्याला राष्ट्रपती पदकाची मोहर

भूमिपुत्राच्या कार्याला राष्ट्रपती पदकाची मोहर

Next

नेरीच्या अतुल फुलझेलेंचा होणार गौरव : शिक्षकाच्या मुलाची देशसेवेसाठी अशीही धडपड
राजकुमार चुनारकर  चिमूर
चिमूर क्रांतीभुमिपासून ११ किलो मिटर अंतरावर असलेल्या नेरी येथे लहानपणापासून बाळकडू घेत प्राथमिक शिक्षण घेवून वैद्यकीय पदवी घेत दीड वर्षे ग्रामीण जनतेला आरोग्याची सेवा दिली. मात्र याही पेक्षा देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले डॉ. अतुल फुलझेले २००१ च्या तुकडीत आयपीएस झाले व दहा वर्षे हिमाचल सारख्या राज्यात सक्षम सेवा दिली. आता आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथे सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या क्रांती नगरीतील डॉ. अतुल फुलझेले या भूमिपुत्राच्या कार्याला प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती पदाची मोहर लागणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचे नाव आजही अजरामर आहे. याच तालुक्यातील नेरी या गावात जनता प्राथमिक शाळा व जनता हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील ११ व १२ वी आनंदवन महाविद्यालय वरोरा तर एमबीबीएस यवतमाळ येथून केले. वैद्यकीय शिक्षणानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा व खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिली. या सेवेपेक्षा दुसरी काही तरी वेगळी सेवा करावी, या महत्त्वाकांक्षेमुळे डॉ. अतुल फुलझेले यांनी वैद्यकीय सेवेला पूर्णविराम देत प्रशासकीय क्षेत्र निवडले.
देशाच्या दुश्मनासोबत लढण्याचा व देशासाठी काही तरी करावे, या हेतुने प्रेरीत होवून वैद्यकीय अधिकारी पदाचा त्याग करीत त्यांनी सन २००१ च्या हिमाचल कॅडरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस सेवा सुरू केली. त्यामध्ये कागडा, उना येथे सेवा देत सलग दहा वर्षे हिमाचल प्रदेशात उत्कृष्ट सेवा दिली.डॉ. फुलझेले यांच्या हिमाचल प्रदेशातील कार्यकाळात प्रामुख्याने धर्मशाळा येथे प्रथम आयपीएल क्रिकेट मॅच दरम्यान रोड मॅपची आजही तेवढ्याच प्रखरतेने आठवण केली जाते. या अगोदर डॉ. अतुल फुलझेले यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन २००९ मध्ये डी. जी. पी. डिस्कर व २०१० मध्ये शिमला येथेही पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. डॉ. फुलझले यांच्या उत्कृष्ट कार्याची केंद्र सरकारने दखल घेत २०११ मध्ये सी.बी.आय. शाखेसाठी निवड केली. आजच्या घडीला डॉ. अतुल फुलझेले मुंबई येथे सी.बी.आय.मध्ये डी.आय.जी. म्हणून देशाला सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवेची दखल घेत केंद्र सरकार प्रजासत्ताक दिनी त्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करणार आहे. क्रांतीभूमीतील एका शिक्षकाच्या मुलाला देश सेवेसाठी दिलेल्या योगदानाने तालुक्यासह जिल्ह्याची मान अभिमानाने ताट झाली आहे.

Web Title: President's Medal Stamp to the Work of the People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.