अपघात टाळण्यासाठी चालकांत जागृती आवश्यक

By admin | Published: January 23, 2017 12:40 AM2017-01-23T00:40:13+5:302017-01-23T00:40:13+5:30

वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, घरी आहेत मुलंबाळं, वाहतुकीचे नियम पाळा आदी सूचना फलकावर, दगडावर व रस्त्याच्या बाजूला लिहलेल्या असतात.

To prevent accidents, drivers need awareness | अपघात टाळण्यासाठी चालकांत जागृती आवश्यक

अपघात टाळण्यासाठी चालकांत जागृती आवश्यक

Next

विनय अहिरे : विद्यार्थ्यांना वाटली वाहतूक नियमांची पुस्तिका
ब्रह्मपुरी : वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, घरी आहेत मुलंबाळं, वाहतुकीचे नियम पाळा आदी सूचना फलकावर, दगडावर व रस्त्याच्या बाजूला लिहलेल्या असतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. भारतात दर वर्षाला अपघाताने फार मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यूमुखी पडतात. त्याला कारणे अनेक आहेत. वाहतुकीची नियम न पाळणे, दारूचे व्यसन, मोबाईलचा नाद, मन:स्थिती चांगली नसणे आदी बाबीमुळे आपण आपला जीव गमावून दुसऱ्यांनाही मारतो म्हणून अपघात टाळण्यासाठी चालकांची जाणीवजागृती आवश्यक आहे, असे विचार चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी मांडले.
ते ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन आयोजित ‘रस्ता सडक वाहतुक सुरक्षा पंधरवाडा’ कार्यक्रमात ने. हि. महाविद्यालयाच्या सभागृहात बोलत होते.
फअध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे होते. यावेळी मंचावर प्रफुल्ल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, उपप्राचार्य डॉ. डी.यू. पारधी, मेजर विनोद नरड, डॉ. धनंजय गहाणे, डॉ. धनराज खानोरकर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले की, तरुणांनी सांभाळून वाहने चालवावी. तुम्ही सगळे स्मार्ट आहात. वाहतुकीचे नियम पाळले तर आणखी स्मार्ट होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. जवळपास एक तास विनय अहिरेनी सचित्र मार्गदर्शन घडवून आणून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या सूचनाचे पत्रक वाटले गेले.
प्रास्ताविक ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, संचालन प्रा. डॉ. धनराज खानोरकर, आभार उपप्राचार्य डॉ. डी.ए. पारधीनी मानले. रासेयो प्रमुख प्रा. प्रकाश वट्टी, प्रा. मिलिंद पठाडे, प्रा. सोनाली पारधी, डॉ. कुलजित कौरगिल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: To prevent accidents, drivers need awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.