डेंग्यू व इतर रोगांचे वाढते प्रमाण रोखा
By admin | Published: November 19, 2014 10:37 PM2014-11-19T22:37:09+5:302014-11-19T22:37:09+5:30
राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे.
चंद्रपूर : राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करुन संबंंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना प्रतिबंधानात्मक उपाय म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी कररण्यात आली. स्वच्छतेबाबत प्रशासन किती उदासीन आहे व खरी परिस्थिती काय हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी जिल्हा व शहरातील विविध विषयांवर चर्चा करुन नागरिकांत असलेली भीती जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगितली. यावर तत्काळ उपाययोजना करुन भीत दूर करण्याचे संघटनेने म्हटले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावर त्वरीत उपाययोजना करुन प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे व संबंधित अधिकारी व प्रशासनाला आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपजिल्हाध्यक्ष शैलेश केळझरकर, जिल्हासंघटक कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष विवेक धोटे, शहराध्यक्ष राकेश बोरीकर, राहुल क्षिरसागर, शहर उपाध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव लावीत कंजर, शहर संघटक पप्पू कंजर, सतीश वाकडे, नितीन टेकाम, स्वप्नील राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)