पितृपंधरवाड्यात भाजीपाला खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:19+5:302021-09-25T04:29:19+5:30
बॉक्स व्यापारी काय म्हणतात? मागील काही दिवसांत सततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक ...
बॉक्स
व्यापारी काय म्हणतात?
मागील काही दिवसांत सततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यातच इंधनाच्या दरामध्येही प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाढ झाली आहे.
-रवी कोरगंदावार
------
अतिवृष्टीने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हंगामात व्यस्त असल्याने भाजीपाला बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. गणेशोत्सव व पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.
- संजय कन्नावार
----
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
कोरोनामुळे उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणारी महागाईमुळे बजेट बसवणे कठीण झाले आहे. थोडी भाजी स्वत मिळते म्हणून गंजवॉर्ड किंवा बाजार समितीमध्ये जातो म्हटले तर ५० ते ६० रुपये भाडे द्यावे लागतात.
- प्रतिमा कोडापे, गृहिणी
------
कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा गंजवॉर्ड येथे एक पाव किंवा अर्धा किलो भाजी मिळत नाही. घरीच केवळ तीनच लोक असल्याने तेवढी भाजी खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळे ठोक मार्केटपेक्षा हातागाडीवाल्याकडूनच भाजीपाला खरेदी करतो.
- गंधू रायपुरे, गृहिणी
----
वांगे ४० ५०
भोपळा ३० ४०
भेंडी २० ३०
दुधी ४० ६०
गवार ४५ ८०
शिमला ३५ ४०
फुलकोबी ८० १००
सांभार १८० २००