'त्या' बकऱ्याची किंमत तब्बल २५ लाख रुपये? .. 'हे' आहे विशेष कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:24 PM2021-06-28T12:24:23+5:302021-06-28T12:24:48+5:30

Chandrapur News सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा विक्रीस उपलब्ध असलेल्या बकऱ्याची जी किंमत आहे, चक्क २५ लाख रुपये.

The price of that goat is Rs 25 lakh? .. 'This' is a special reason | 'त्या' बकऱ्याची किंमत तब्बल २५ लाख रुपये? .. 'हे' आहे विशेष कारण

'त्या' बकऱ्याची किंमत तब्बल २५ लाख रुपये? .. 'हे' आहे विशेष कारण

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रीसाठी सावली तालुक्यातील पालेबारसा येथे लावले फलक

संदीप बांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, या बकऱ्याची जी किंमत ठरविण्यात आली आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. चक्क २५ लाख रुपये, आता बोला.

सावली तालुक्यात पालेबारसा गाव आहे. या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा आहे. साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याची चांगली जोपासना केली असून बकऱ्याचे वजन ८५ किलो आहे. आता हा बकरा त्यांनी विक्रीसाठी काढला आहे. मात्र, या बकऱ्याची किंमत त्यांनी २५ लाख रुपये ठेवली आहे. हा बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनरही त्यांनी गावात लावून टाकले आहे. यामुळे विविध ठिकाणी चचेर्ला उधाण आले आहे. लाखो रुपयांची किंमत असलेल्या बकऱ्यामधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे, हे मात्र कुणालाही माहीत नाही. पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोनद्वारे विचारणा केली असता बकऱ्याच्या कपाळावर चांद आहे आणि बकरी ईदनिमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला विशेष महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The price of that goat is Rs 25 lakh? .. 'This' is a special reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.