औषधांच्या उत्पादनावर व उत्पादीत वस्तूंवर जीएसटीसह किमती छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:24+5:302021-07-28T04:29:24+5:30
बाजारात कोणतीही वस्तू अथवा औषधी विकत घेताना एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत पाहतो. एक दुकानदार एमआरपी भावाने ...
बाजारात कोणतीही वस्तू अथवा औषधी विकत घेताना एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत पाहतो. एक दुकानदार एमआरपी भावाने वस्तू विकतो तर दुसरा दुकानदार तीच वस्तू एमआरपीपेक्षा कमी दराने विकतो. बाजारामध्ये एकाच कंपनीच्या वस्तू बाकी दुकानांमध्ये वेगवेगळी किंमत कशी असू शकते. याचाच अर्थ एमआरपीपेक्षा एखादी वस्तू जास्तीत जास्त भावाने विकण्याचे दुकानदाराला स्वातंत्र्य आहे. वस्तूंची खरी किंमत ही खूप कमी असते. ज्याची ग्राहकाला कल्पनाच नसते. म्हणून प्रत्येक वस्तू जी बाजारामध्ये विकत मिळते. त्यावर वस्तूंची उत्पादन किंमत, त्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर आणि वस्तूवरील दुकानदाराचा नफा हे छापणे अनिवार्य केले पाहिजे. यामुळे बाजारामध्ये एकाच कंपनीच्या वस्तूची वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळी किंमत राहणार नाही. ग्राहकाची फसवणूक होणार नाही. दुकानदाराला छापील किमतीनेच वस्तू विकावी लागेल, असे मागणीवजा पत्र भद्रावती येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी सचिव अविनाश जोशी यांच्या मार्गदर्शनात वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, अशोक शेंडे, प्रवीण चिमुरकर यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठविले आहे.