प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र गरीबांसाठी वरदान ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:32 PM2018-02-06T23:32:20+5:302018-02-06T23:32:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा धोरणात्मक निर्णय घेवून प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत.

Prime Minister Janaushadhi Center will be a blessing for the poor | प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र गरीबांसाठी वरदान ठरणार

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र गरीबांसाठी वरदान ठरणार

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : बाबुपेठ येथे भारतीय जनऔषधी केंद्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा धोरणात्मक निर्णय घेवून प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. देशातील गोरगरीब कुंटुंबीयांसाठी शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांची उभारणी केली. या केंद्रातून अत्यल्प किमतीमध्ये विविध आजारांवरील औषधी स्वस्त दिले जात असून गरिबांसाठी वरदान ठरले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. रविवारी बाबुपेठ येथे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री राहुल सराफ, मोहन चौधरी, राजू घरोटे, रघुवीर अहिर, मनपा झोन सभापती आशा आबोजवार, नगरसेवक शाम कनकम, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुलकर, निलम आक्केवार, मेडिकल स्टोअर्सचे संचालक राजन्ना भंडारी, रामलू भंडारी, राजू कामपेल्ली, जितेंद्र धोटे, गणेश गेडाम, रामास्वामी पुरेड्डी, संजय मिसलवार, सिनू रंगेरी आदी उपस्थित होते. ना. अहिर म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना महागडी औषध घेणे कदापि परवडत नाही. त्यामुळे उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच स्वस्त दरात औषधी देण्यासाठी चंद्रपूर शहरात जन औषशी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातून मिळणाºया सवलतींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सेवेसंदर्भात तक्रार करा
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रातून गोरगरिबांना स्वस्त दरात औषधी विकत घेता येणार आहे. केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या केंद्रातील सेवेविषयी अडचणी आल्यास नागरिकांनी तक्रारी दाखल करावी, असे मत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. याशिवाय, केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

Web Title: Prime Minister Janaushadhi Center will be a blessing for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.