प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:17 PM2018-07-18T23:17:56+5:302018-07-18T23:18:23+5:30
शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस इत्यादी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन या रथाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे.
या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेत कर्जदार शेतकºयांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख २४ जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वरील सर्व पीकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.
तर बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांचे कर्ज व विमा हप्ता सी.एस.सी. मार्फत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.
सी.एस.सी.ई.गर्व्हनंस सव्हीर्सेस इंडिया लिमिटेडद्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रातर्फे या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यास मदत करणार आहेत. तेव्हा शेतकºयांनी विमा काढण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.
या चित्ररथाद्वारे जिल्हयात ३१ जुलैपर्यंत विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विम्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.