हृदय शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधानांकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:35 AM2017-01-13T00:35:11+5:302017-01-13T00:35:11+5:30

पंतप्रधान हे देशाचे असतात, तिथे सर्वसामान्यांची कैफीयत कुणी ऐकत नाही, असाच आजपर्यंत गावखेड्यात ऐकण्यास मिळत होते.

Prime Minister's help for cardiovascular surgery | हृदय शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधानांकडून मदत

हृदय शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधानांकडून मदत

Next

५० हजार रूपयाचे सहाय्य : मोठेगाव येथील विद्यार्थिनीने मांडली होती पत्रातून कैफीयत
राजकुमार चुनारकर चिमूर
पंतप्रधान हे देशाचे असतात, तिथे सर्वसामान्यांची कैफीयत कुणी ऐकत नाही, असाच आजपर्यंत गावखेड्यात ऐकण्यास मिळत होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान असुनही ते मातीशी कसे जुळले आहेत, याचा अनुभव चिमूर तालुक्यातील मोठेगाव येथील हृदयरुग्ण किरण नथ्थु मांडरे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या परिवाराला खुद्द पंतप्रधानांनी उपचारासाठी दिलेल्या मदतीने आला आहे.
दिल्ली ते चिमूर या हजारो किलोमीटर अंतरावरून ग्रामीण भागातील आदिवासी गावात मदत आली. त्यामुळे पंतप्रधान सर्वसामान्यांशी किती आपुलकीने जुळले आहेत, याचा अनुभव मोठेगाव येथील मांडरे परिवाराला आला आहे. चिमूर तालुक्यातील मोठेगाव या तीन हजार लोकवस्तीच्या गावात नथ्थुजी मांडरे यांचे कुटुंब रोज मजुरी करून आपले जीवन जगत आहेत. लता व नथ्थु मांडरे यांच्या संसार वेलीवर प्रमोद व किरण या दोन अपत्यांनी जन्म घेतला. नथ्थु मांडरे यांना एक एकर शेती असल्याने या शेतीवर परिवाराचा गाढा चालत नव्हता. त्यामुळे लता व नथ्थु हे रोज मजुरी करून आपल्या दोन मुलाचे पालनपोषण करीत होते. नथ्थु मांडरे यांचा एकुलता एक असलेला प्रमोद मागील चार महिन्याआधी कॅन्सर आजाराने मृत पावला. त्यातच मुलगी किरण मागील अनेक वर्षापासून हृदयरोगाने ग्रस्त होती. त्यामध्ये मुलगा अल्प वयात सोडुन गेल्याने लता व नथ्थु यांचा म्हातारणाचा आधार गेल्याचे दु:खाचा डोंगर या परिवारावर कोसळला. त्यात किरण हृदयरोगाने ग्रस्त, त्यामुळे परिवाराचे पालनपोषण व किरणच्या उपचाराचा प्रश्न नथ्थु मांडरे यांच्यापुढे उभा ठाकला होता.
आर्थिक अडचणीने किरणवर उपचार व तिचे शिक्षण कसे करायचे या विवंचनेत. किरण गावातीलच लोकविद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. मात्र प्रकृती व आर्थिक अडचणीमुळे किरणने दहावीतून शाळा सोडली व घरच्यांना कामात हातभार लावत होती. मात्र एकुलता एक मुलाच्या जाण्याचे दु:ख व किरणच्या हृदयरोगाचे दु:ख नथ्थुला स्वस्थ बसू देत नव्हते. किरणच्या उपचारासाठी डॉक्टरानी दोन ते तीन लाखाचा खर्च सांगितला. एवढा पैसा कसा जमवायचा हा मोठा प्रश्न मांढरे परिवारापुढे ठाकला होता.
याच दरम्यान चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरातून तपासणी करत येथील उपसभापती विलास कोयम यांच्या सहकार्याने नागपूर येथे उपचार सुरू करण्यात आले. अशातच सतरा वर्षीय किरणने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे आपली कैफीयत मांडली. या पत्राची दखल घेत चक्क नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय कोष मधुन २२ डिसेंबर २०१६ ला किरणला चक्क पत्र पाठवून ५० हजाराची मदत करण्याचे कळविले. ही मदत व राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या मदतीने आमदार भांगडियाचे आरोग्य समन्वयक देवेन गणविर यांच्या सहकार्यातून किरणच्या हृदयाचे वॉल बदलवण्यात येणार आहे. चक्क प्रधानमंत्री या गरीब विद्यार्थिनीच्या पत्राची दखल घेत मदतीचा हात दिल्याने ते सर्वसामान्याची जाणीव करतात, असा अनुभव मांढरे कुटुंबाला आला आहे.

Web Title: Prime Minister's help for cardiovascular surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.