नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:20 AM2018-03-08T01:20:05+5:302018-03-08T01:20:05+5:30

राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, .....

Primitive kollam for life on water in the Nali | नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

Next
ठळक मुद्दे३०० लोकांची वस्ती : पाणी, वीज, रस्ता व घरकुलापासूनही वंचित

आनंद भेंडे।
ऑनलाईन लोकमत
राजुरा : राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, पाणी, रस्ता, घरकूल, राशन कार्ड व इतर सोई सवलतीपासून वंचित आहेत. पाण्याची सोय नसल्यामुळे आजही त्यांना नाल्यातीलच पाण्यावर तहान भागवावी लाग आहे.
शासनाचे अधिकारी व राजकीय नेते निवडणूक आली की विविध आश्वासने देतात. परंतु अद्याप एकानेही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील रामू भिमू कुमरे, भोजी जंगु आत्राम, माकु भित्तु आत्राम यांनी ‘लोकमत’ जवळ संताप व्यक्त केला.
ग्रामपंचायत कोष्टाळा व विरूर वन परिक्षेत्राच्या कोष्टाळा कक्ष क्रमांक १२६ मध्ये अतिक्रमण करून शेती व घरे बांधून हे आदिम कोलाम बांधव वास्तव्य करीत आहे. गावापासून दूर व जंगल परिसरात राहून शेती करणे व बांबूपासून ताटवे, टोपले बनवून बाजारात विक्री करणे, त्यापासून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. कोलामांनी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल देण्याची मागणी पंचायत समिती व आमदारांकडे वारंवार निवेदन देऊन केली आहे. मात्र अद्यापही बोअरवेलची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे आजही नाल्यात खड्डा खोदून पाणी पिणे सुरू आहे. तसेच त्यांना विजेअभावी अंधारात जीवन जगावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे शेताच्या पायवाटवरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस पडला तर या मार्गावरून जाणे-येणे बंद होते. त्यामुळे आजारी लोकांना खाटेवर तडफडत राहावे लागते.
शासनाच्या वार्षिक बजेटच्या ९ टक्के रक्कम आदिम आदिवासींच्या विकासासाठी सुरक्षित ठेवली जाते. आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत ही रक्कम खर्च केली जाते. परंतु कोलाम बांधव आजही विकासापासून कोसोदूर आहेत.

पंचायत समिती राजुराद्वारा बगलवाही येथील कोलाम वस्तीत पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरवेल मंजूर करण्यात आली. परंतु वन विभागाच्या आडकाठीमुळे बोअरवेल खोदण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांना अवगत करण्यात आले आहे. वन्यप्राणी व कार्यरत वन कर्मचाºयांसाठी वनात बोअरवेल खोदली जाते, मग कोलाम बांधवांसाठी का खोदू दिली जात नाही, यावर वन व राजस्व विभागात चर्चा सुरू आहे.
- ओमप्रकाश रामावत,
संवर्ग विकास अधिकारी,
पंचायत समिती, राजुरा

Web Title: Primitive kollam for life on water in the Nali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.