मोहफुलाच्या हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:24+5:302021-09-07T04:34:24+5:30
जंगलाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात मोहा दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री केली जाते. नव्याने बदलून आलेले ठाणेदार गणभे यांनी ...
जंगलाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात मोहा दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री केली जाते. नव्याने बदलून आलेले ठाणेदार गणभे यांनी यावर निर्बंधाकरिता धडक मोहीम आखली आहे. पिपर्डा येथील रानतलाव जंगल परिसरात हातभट्टी लावून मोहा दारूची निर्मिती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून १० ड्रममधील ५०० किलो मोहा सडवा जप्त केला. त्याची किमत एक लाख रुपये, दोन प्लास्टिक कॅनमध्ये गाळलेली २० लिटर मोहा दारू असे साहित्य जप्त करण्यात आले. जंगलात आरोपी नंदू मानकर व दामोधर किन्नाके पसार झाले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात विलास निमगडे, शैलेश मडावी, चिवन खामकर यांनी केली.
महावितरण कार्यालयावर धडकले नागरिक
चंद्रपूर : वरोरा शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे ऑनलाइनची कामे प्रभावित झाली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांंनी शनिवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून नागरिकांना नियमित बिल पाठविले जाते. बिलाचा भरणा न करणाऱ्यांची वीज जोडणी कापली जाते. यासाठी तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकारी विजेचा सुरू असलेला लपंडाव मात्र थांबवू शकत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.