कैद्याची मद्यपी पोलिसाला झाडूने मारहाण; चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

By परिमल डोहणे | Published: May 22, 2023 07:03 PM2023-05-22T19:03:11+5:302023-05-22T19:03:30+5:30

Chandrapur News मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Prisoner Beats Cop With Broom; Type in Chandrapur Medical College | कैद्याची मद्यपी पोलिसाला झाडूने मारहाण; चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

कैद्याची मद्यपी पोलिसाला झाडूने मारहाण; चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

googlenewsNext

परिमल डोहणे

 चंद्रपूर : मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो व्हिडिओ मागील आठवड्यातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच तो पोलिस शिपाई मद्य प्राशन करून होता, अशी चर्चा आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात मागील अनेक महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो विचित्र वागतो. या कैद्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. मात्र, ज्या पोलिस शिपायाने त्याला रुग्णालयात नेले तो पोलिस शिपाई स्वतः दारूच्या नशेत धुत होता. दरम्यान, कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने रुग्णालयामध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस शिपायास मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून त्याला सोडवले. मारहाण सुरू असताना एकाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आता हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

मी मागील काही दिवसांपासून सुट्ट्यांवर आहे. तसेच तो व्हिडिओ बघितला नाही. त्यामुळे ही घटना खरी आहे की खोटी याबाबत सांगू शकत नाही. परंतु, चार ते पाच दिवसांपूर्वी एका मानसिक संतुलन बिघडलेल्या कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेले होते. बी बाब खरी आहे.
- वैभव आगे, कारागृह अधीक्षक, चंद्रपूर.

Web Title: Prisoner Beats Cop With Broom; Type in Chandrapur Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.