तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:19+5:302021-06-09T04:36:19+5:30
गोंडपिपरी : कोरोनामुळे टाळेबंदी केली. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका विद्यार्थांना बसला. शाळा बंद आहेत. शालेय विध्यार्थांची अभ्यासाची लिंक तुटली. अशात ...
गोंडपिपरी : कोरोनामुळे टाळेबंदी केली. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका विद्यार्थांना बसला. शाळा बंद आहेत. शालेय विध्यार्थांची अभ्यासाची लिंक तुटली. अशात ऑनलाइनच्या माध्यमातून यंग ब्रिगेडने चित्रकला स्पर्धा घेतली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस वितरण करण्यात आले.
तालुक्यातून एकूण ४८ विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी प्रथमतः उत्कृष्ट १० चित्रांची निवड करण्यात आली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या विषयावर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट १० विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने तेजस्विनी सातपुते, अनुश्री झुराले, चैतन्या मारगोनवार, प्रतीक्षा दुधे, निशा चहांदे, वैष्णवी कुंदोजवार, जान्हवी गोविंदवार, समीक्षा नैताम, स्नेहल नैताम यांची निवड करण्यात आली होती. या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक हेमंत कत्रोजवार व कलारत्न पुरस्कार विजेत्या अंकिता नवघरे यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली.
चित्रकला स्पर्धेत स्नेहल नैताम प्रथम, चैतन्या मारगोनवार द्वितीय, अनुश्री झुराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे ठाणेदार संदीप धोबे यांच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनिकेत दुर्गे, यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सूरज माडूरवार, समीर नीमगडे, प्रमोद दुर्गे, आशिष फुलझेले, सत्यवान सुरपाम यांची उपस्थिती होती.