बक्षीस वितरण ४ जुलैपासून सुरु होणार

By admin | Published: July 1, 2016 01:06 AM2016-07-01T01:06:54+5:302016-07-01T01:06:54+5:30

लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली.

The prize distribution will start from July 4 | बक्षीस वितरण ४ जुलैपासून सुरु होणार

बक्षीस वितरण ४ जुलैपासून सुरु होणार

Next

राज्यस्तरीय सुवर्णस्पर्श योजना- २०१५ : लोकमत सखी मंचचा उपक्रम
चंद्रपूर : लोकमत सखी मंच व सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली. या योजनेतील राज्यस्तरीय महाबंपर बक्षीस १०० ग्रॅम सोन्याच्या नेकलेसची मानकरी नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवंत सखी ठरली आहे.
वडाळा-पाथर्डी रोडवरील नभांगण लॉन्स या ठिकाणी सदर योजनेची सोडत मनिषा मराठे, डॉ. उमेश मराठे, ज्यु. जॉनी लिव्हर, किचन इसेन्शियलचे संचालक केयूर नागदा, गायिका उमा नेने, गायिका श्रेयसी रॉय, सुवर्णस्पर्शचे समाधन पाटील, राजू भोर, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक या मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा १,०१,००० रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस पुण्याच्या उमा देशपांडे यांना तर तृतीय क्रमांकाचा ५१००० रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस अमरावतीच्या अरुणा राऊत यांना मिळाला आहे.
१५ वर्षांपासून ‘लोकमत’ने महिलांसाठी ‘सखी मंच’ नावाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी नित्य नवे उपक्रम राबवून महिलांना ‘चूल आणि मूल’ या रेखीव आणि परंपरागत चौकटीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी सखी मंच कार्यरत आहे.
यंदाही महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातील सुमारे दोन लाख सखींसाठी २५ लाख रुपयांच्या बक्षिसांची योजना राबविण्यात आली होती. त्यात महाबंपर तसेच राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी सोन्याच्या नेकलेसची बक्षिसे ठेवण्यात आली. त्यासोबतच ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्तीनिहाय लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.
पहिले बक्षीस (शूटिंग फॉर मेन)
१) वर्षा पांडे, नागपूर २) अंजू कडू, नागपूर ३) अलका राजू लांजेवार, तुमसर ४) रेखा अतकरे, तिरोडा ५) ज्योती पवार-काटोल ६) शिवकन्या कांबळे, सालेकसा ७) जयश्री धाईत, गडचिरोली ८) विद्या येळणे, गडचिरोली ९) कल्पना वाघ, वरोरा १०) प्रीती धोटे, भंडारा ११) भावना बावनकर, चंद्रपूर १२) प्रणिता संजय गौरीकर, नागपूर १३) रिषिता नीरज साबळे, भंडारा १४) स्मिता गुलाब बोमेवार, आलापल्ली १५) बबिता बोपचे, गोंदिया
द्वितीय क्रमांक (स्टीलमल्टी कढई)
चंद्रपूर- माधुरी योगिंद्र खाडे, सिंधुताई शामसुंदर झोडे, निर्मला संजय मोरे, ज्योत्स्ना विजय मगरे, संगिता दशरथ सोनकुसरे, सुनयना राकेश मुल्लेवार, नीता रवी धामनगे, अलका संजय टिपले, वंदना मोहन मासुरकर, विनिता ढगे, वैशाली वसंत कराडे, संगीता उमाकांत घोडेस्वार.
तृतीय क्रमांक (कटलेरी सेट)-
चंद्रपूर- अपर्णा जयेश मेश्राम, प्रज्ञा विलास गेडाम, रिता गणेश कोथलाडे, उर्मिला शिवाजी नागरे, सोनाली प्रवीण डुमरे, वृषाली विजय रामडुगवार, दर्शना अमर चांदेकर, संगिता प्रशांत कोतपल्लीवार, शुचिता सुरेश जनके, रेखा विठ्ठलराव मासटवार, रसिका सुनील मानकर, प्राजक्ता प्रशांत सेलोकर,
चौथा क्रमांक (कुकिंग सेट)
चंद्रपूर- सौ. शुभांगी मंगेश पातुलवार, सौ. मीनाक्षी मधुकरराव भुसारी, सोनाली नंदकिशोर वांढरे, अनुराधा वेलतुलवार, बमल गुणाजी मेश्राम, प्रतीक्षा देवाजी गेडाम, माया प्रवीण जिवतोडे, विभा प्रवीण भोयर, सीमा दिगंबर जेकरे, सुरेखा राजेंद्र डाखोरे, स्वेता गोविंदराव वानखेडे, सौ. रंजना कत्रोलवार, शीतल मकरंद चौधरी, गीता महेन्द्र डांगे, अर्चना राजू शिवरकर, भानुमती वसंतराव बडवाईक, सुनीता अरुणराव जमदाडे, वैशाली संदीप बांगडे, ज्योती प्रकाश हिबारे, वर्षा प्रमोदराव धोपटे, नलिनी राजेंद्र जोगी, आशा दुधपचारे, नीलिमा बोर्डेवार, आरती अभय चेपुरवार.
पाचवा पुरस्कार-(गिफ्ट हॅम्पर)-
सीमा ग्रिनीश जांभूळकर, निगरेजा मिलिंद उराडे, सविता धनराज सहारे, रजनी रमेश बगनारे, दुर्गा दौलत तिग्मा, स्नेहलता दिलीप मोगरे, चंद्रकला मुरलीधर नरोटे, पुष्पा लीलाधर पाठक, मंदा कुलदीप इंदूरकर, रजनी यादवराव गहाणे, सुमित्रा उमाकांत चिलांगे, सौ. वैशाली प्रशांत होकम, सुनिता विजय सातवे, भारती प्रशांत खोब्रागडे, लता विवेक लडगुलवार, अमिता तुळशीराम हिल्पानी, छबिना हमराज टेंभुर्णे, संगिता अनिल चहांदे, वृंदा मारोतराव लांजेवार, पौर्णिमा रामहरी दिधोरे, ज्योती नरेश शहारे.
चंद्रपूर- इंदू दयानंद धोगंडे, रीता शैलेश पाटील, सपना नितीन बेलोरकर, अंजना सुभाष घुंगरुड, अनिता नरेश पाटीलकर, मीना रवींद्र कपाळे, रमा अशोक भागवत, सुनिता पुरुषोत्तम खामनकर, सुनंदा गजानन भारस्कर, भारती प्रेमानंद नगराळे, कांचन चंद्रभान शहारे, जयश्री अमोल गोरख, वंदना मधुकर दडमल, जागृती पंकज सावरकर, सविता गेंदलाल लुटे, अर्चना अनिल बोबडे, निलिना विजय अंबाघरे, अलका प्रदीप बावनकुळे, संगिता रवींद्र मोटके, प्रतिभा अरविंद जिवतोडे, मनिषा हरिचंद्र नन्नावरे, शारदा गोविंद पिसे, सुषमा गोपाल कालोरे, ज्योत्स्ना श्रीकांत दाते.

बक्षीस वितरणाच्या तारीख व वेळ
लोकमत सखी मंच - २०१५ चे बक्षिस वितरण ४ जुलै २०१६ ते ६ जुलै २०१६ या तीन दिवसांत सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा, दुसरा माळा, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या बाजूला, मेन रोड चंद्रपूर येथून करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ९०११३२२६७४ येथे संपर्क साधावा. सखींनी येताना सोबत ओळखपत्राची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.

Web Title: The prize distribution will start from July 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.