घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांना पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:05+5:302021-09-14T04:33:05+5:30
इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती, प्लास्टिक आणि ...
इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती, प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट, नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावट, विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा असणे आवश्यक आहे.
घरी किंवा मनपातर्फे उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करावे, वृक्षलागवड, जलसंधारण, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, स्वछता, प्रदूषण थांबविणे, वातावरण बदल जागृती इत्यादीबाबत देखावे (थीम) असावेत. ही स्पर्धा २ गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात घरगुती गणेश उत्सवाचा समावेश असेल. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील ३ झोनमधील प्रत्येक झोननिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय असे ३ बक्षीस देण्यात येणार आहेत. दुसऱ्या गटात सार्वजनिक गणेश मंडळाचा समावेश राहील. या गटातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस देण्यात येतील.