जागेअभावासी बसपार्किंगची समस्या; प्रवाशांना मनस्ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:55+5:302021-08-29T04:27:55+5:30
त्यामुळे या बसस्थानकावर नेहमीच गर्दी दिसून येते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यामुळे ...
त्यामुळे या बसस्थानकावर नेहमीच गर्दी दिसून येते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यामुळे बसस्थानक गर्दीने फुलून दिसते. त्यातच मागील काही वर्षात चंद्रपुरातील बसस्थानकांचे बांधकाम सुरु आहे. तात्पुरत्या स्वरुपाच्या बसस्थानकातून कारभार सुरु आहे. परिणामी जागा अपुरी पडत असल्याने बस ठेवण्यासाठी मोठी अडचण जात आहे. परिणामी कधी-कधी फलाटावरच बस उभी राहत नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठी धावपळ करावी लागत आहे.
बॉक्स
बसस्थानक मोठे आणि सुसज्ज होत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र सध्या जागेअभावी फलाट कमी असल्याने बस कधीकधी फलाटाच्या बाहेर लागते. त्यामुळे मोठी पंचायत होते. अनेकदा तर बस लागून असते तरी कळत नाही. अनाऊन्सिंग होत असल्याने माहिती होते.
-प्रशांत रापेल्लीवार, प्रवासी
-----
कोट
मागील दोन ते तीन वर्षांपासून बसस्थानकाचे काम सुरु आहे. मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नाही. परिणामी वाहनचालकास प्रवाशांना अडचण होते. बस कोणत्या गावची कुठे लागली हे कळत नाही.
-रोहित गेडाम, प्रवासी
------
बॉक्स
कामाला गती द्यावी
मागील दोन ते तीन वर्षांपासून बसस्थानकाचे काम सुरु आहे. मात्र अद्यापही अर्धवट काम आहे. मात्र याचा फटका प्रवाशांसह वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ज्यावेळी बस हॉल्टिंग असते. तेथील चालक वाहकांची तर मोठी पंचायत होते. त्यामुळे कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.