वनखात्याच्या मदतीने मानोरा गावाची समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:33+5:302021-02-08T04:24:33+5:30
शेत कुंपण व गॅस सबसिडीची मागणी पूर्ण करणार बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा गावातील शेतकऱ्यांच्या कुंपणाची समस्या व गृहिणीची स्वयंपाकाची ...
शेत कुंपण व गॅस सबसिडीची मागणी पूर्ण करणार
बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा गावातील शेतकऱ्यांच्या कुंपणाची समस्या व गृहिणीची स्वयंपाकाची समस्या सोडविण्याकरिता बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील मानोरा उपक्षेत्र सरसावले असून रविवारी मानोरा वनखात्याने ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक घेऊन गावकऱ्यांची समस्या ऐकली व त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
या सभेत मानोरा वन क्षेत्राचे क्षेत्र सहायक प्रवीण वीरूटकर, सरपंच जीवनकला ढोंगे,उपसरपंच लहुजी टिकले,माजी पोलीस पाटील देवीदास पिपरे,ऋषी पिपरे,मनिषा ढोंगे, रत्नमाला उराडे,मानोरा वन समितीचे अध्यक्ष अजय गवारे, राजू बुरांडे, विजय पिपरे, रोशन अली व गावकऱ्यांची उपस्थिती होती.
सभेत क्षेत्र सहायक प्रवीण वीरूटकर यांनी सांगितले की मानोरा परिक्षेत्रात वाघ नरभक्षी झाल्यामुळे काड्या आणि सरपणासाठी जंगलात जाऊ नका, तेव्हा गावकऱ्यांनी शेतीसाठी कुंपण कसे करायचे, वनखात्याने गॅसची सबसिडी बंद केल्यामुळे गॅस बंद आहे. सरपणाशिवाय स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न केल्यावर वीरूटकर यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन वन खात्याकडे पाठवा, आम्ही वरिष्ठांकडे पाठवू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लहुजी टिकले यांनी केले.