नांदगावातील शेतकºयांची समस्या सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:48 PM2017-10-25T23:48:34+5:302017-10-25T23:48:44+5:30
तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता. चार महिन्यांपासून तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी सोमवारी न्याय मिळवून दिला. चंद्रपूर शहर पोलीस व बल्लारपूर तहसील प्रशासनाने अंमलबजावणी करून जुन्या वादावर पडदा पाडला.
महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २४७ अन्वये शेतकºयांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाल्याने शेतकºयांना ऐन हंगामात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये महिला शेतकरी कल्पना बुरडकर यांनी मालकीच्या सर्व्हे क्रमांक ४७१ व २२० शेत जमिनीतून जाण्यासाठी अन्य शेतकºयांना प्रतिबंध केला होता. यासाठी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाचे दार ठोठावले होते. तहसील प्रशासनानसह उपविभागीय अधिकारी यांच्यासह तब्बल १५ शेतकºयांना वेठीस धरले होते. यामुळे शेती हंगामात अन्य कामासाठी ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली. यामुळे शेतकºयांत तीव्र नाराजी होती. शेतातील उत्पादित मालाची नासाडी होण्याच्या मार्गावर आली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार त ेजिल्हाधिकारी असा प्रवास येथील शेतकºयांंना करावा लागला. परिणामी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी नांदगाव (पोडे) येथील शेतकरी राजकुमार कार्लेकर, शामराव देठे, नरेंद्र मोहितकर, दिलीप देठे, बंडू आमने, चंद्रशेखर आमने, शालीक शेंडे, दादाजी उरकुडे, महादेव उरकुडे, परशुराम जमदाडे, नानाजी गोहणे, शंकर पिंपळकर, नामदेव गोहोकार, सुभाष धोटे, विठ्ठल आमने आदी शेतकºयांची व्यथा लक्षात घेवून १८ आॅक्टोबर रोजी शेतकºयांना वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस आणि बल्लापूर तहसील प्रशासनाच्या वतीने संयुक्त कार्यवाही करून वादग्रस्त रस्ता मोकळा करण्यात आला. आता शेतीकडे सहजपणे जाता येणार आहे. शेतकºयांच्या वहिवाटीच्या रस्ता करुन देण्याची कारवाई नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, मंडळ अधिकारी तलाठी व चंद्रपूर पोलीस ठाण्याचे चिंचोलकर यांनी पोलीस ताफ्यासह केली.