वाही नाला झाला प्रतिष्ठेचा प्रश्न
By admin | Published: April 12, 2017 12:57 AM2017-04-12T00:57:36+5:302017-04-12T00:57:36+5:30
देलनवाडी प्रभाग क्रं ४ मधील वाही नाल्यावर झालेले अतिक्रमण कुणी वाचविण्यासाठी तर कुणी नियमाप्रमाणे कायम राहण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून समोर आलेला आहे.
वाही नाला प्रकरण: नगरपरिषदेच्या सभेत प्रश्न
ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्रं ४ मधील वाही नाल्यावर झालेले अतिक्रमण कुणी वाचविण्यासाठी तर कुणी नियमाप्रमाणे कायम राहण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून समोर आलेला आहे.
ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या सभेत नाल्याच्या अतिक्रमणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नालाच्या बांधकामाची निविदा विचारात न घेता काढण्यात आली आहे. त्यासाठी नगरपरिषदेने ९० लाख रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. पण नाला पूर्ण घेतलेला नाही. काही ठराविकच भाग बांधकामाकरिता घेतला आहे. या बांधकामाअंतर्गत सिटीसर्व्हेनुसार खरच अतिक्रमण काढण्यात येणार आहे काय? याचा खुलासा मात्र करण्यात आला नाही. अंदाजपत्रकात समावेश केल्याप्रमाणे बांधकाम करीत असताना नाल्याची एकूण रुंदी उपलब्ध करुनच काम करण्यात येणार आहे काय? तसेच बांधकामानंतर नाल्याच्या उर्वरीत रुंदीपैकी जागेचा वापर कश्यापद्धतीने व कशासाठी ठरणार असल्याचे काही नियोजन नाही. सदर नाल्याचे ठिकाणी लगतचे रिक्त क्षेत्रात सौंदर्यीकरण करता येत असेल तर त्याची तरतूद कुठेही करण्यात आली नाही. मग उर्वरीत जागेचा प्रश्न निर्माण होण्याची संभावना प्रशासनाने लक्षात घेतली नाही. याचाच अर्थ अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी मान्यता प्राप्त करुन देण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची चर्चा करण्यात येत आहे. बांधकामाव्यतिरिक्त उर्वरीत जागेचा क्षेत्रफळ अहवाल तयार करण्यात आला किंवा नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. सदर नाल्यातून पावसाळ्यात नाल्याचे आजूबाजूचे क्षेत्र तसे शारदा कॉलनी, गांधीनगर, हनुमाननगर, सुंदरनगर वखार महामंडळ परिसर, शेषनगर, गुरुदेव नगर तसेच बारई तलावाचे पाणी दरवर्षी वाहून जात होते. नाला पूर्णपणे अतिक्रमण झाल्याने बारई तलावाची पाण्याची वाढून पाळ फूटण्याचे प्रकार घडत आहे व शेषनगराच्या नागरीकांशी प्रशासन खेळ खेळत आहे. एवढेच नव्हे तर अनेक रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होत आहे. नाला नाल्यासारख्या असता तर हे दुदैवी प्रसंग उद्भवले नसते अशी चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)