एसटी बससेवा बंदमुळे ग्रामीण जनतेची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:14+5:302021-09-02T04:59:14+5:30

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तालुका ब्रह्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचा दौरा केला. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंतर्गत बससेवा पूर्णपणे बंद आहे. खेड्यापाड्यातील लोकांना ...

Problem of rural people due to closure of ST bus service | एसटी बससेवा बंदमुळे ग्रामीण जनतेची अडचण

एसटी बससेवा बंदमुळे ग्रामीण जनतेची अडचण

Next

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तालुका ब्रह्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचा दौरा केला. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंतर्गत बससेवा पूर्णपणे बंद आहे. खेड्यापाड्यातील लोकांना एसटी बसच्या अभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावखेड्यातील लोकांना दैनंदिन कामासाठी तालुक्याला यावेच लागते; पण बसअभावी त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे. गावखेड्यातील जनतेची होत असलेली अडचण बघून ब्रह्मपुरी आगाराने तालुक्यातील अंतर्गत बससेवा सात दिवसांच्या आत सुरू करावी अन्यथा, बीआरएसपीला ब्रह्मपुरी बसस्थानकासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनातून ब्रह्मपुरी एसटी आगाराला देण्यात आला आहे. निवेदन देताना गोपाल मेंढे, सुखदेव राऊत, मार्कंड बावणे, राजेंद्र मेश्राम, नाना रुईकर, ललित घोंगडे, शिल्पा मेश्राम, प्रज्ञा लोणारे, रोशन मेंढे व इतर बीआरएसपीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

310821\img-20210831-wa0050.jpg

आगार प्रमुखाला मागणीचे निवेदन देतांना

Web Title: Problem of rural people due to closure of ST bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.