सास्ती, धोपटाळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:27+5:302021-07-12T04:18:27+5:30

चंद्रपूर : महाजनको व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये कोळसा खरेदीबाबत करार झाला आहे. यानुसार जिल्ह्यातील सास्ती, धोपटाळा येथून ...

The problem of Sasti, Dhopatala project affected farmers will be solved | सास्ती, धोपटाळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न निघणार निकाली

सास्ती, धोपटाळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न निघणार निकाली

googlenewsNext

चंद्रपूर : महाजनको व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये कोळसा खरेदीबाबत करार झाला आहे. यानुसार जिल्ह्यातील सास्ती, धोपटाळा येथून महाजनकोने कोळसा घेतल्यास वाहतुकीचे अंतर कमी होऊन वीज उत्पादन खर्च कमी होणार आहे. महाजनकोतर्फे वेकोलिकडे अधिक कोळशाची मागणी आहे. सास्ती व धोपटाळा खाणीतून कोळसा घेतला तर सुमारे ८२५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जमिनीचा मोबदला व नोकऱ्यांचा प्रश्न तत्काळ निकाली लागू शकतो. याकरिता येथून कोळसा उचल करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती. चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या ऊर्जामंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत येत्या काही दिवसात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न देखील येत्या काही दिवसात मार्गी काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सास्ती युजी टू धोपटाळा ओपन कास्ट प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचा नोकरी व जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे.यावर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह वेकोलि नागपूर मुख्यालयाचे अध्यक्ष व प्रबंध निर्देशक मनोज कुमार, महाजनकोचे माईंनिग संचालक पुरुषोत्तम जाधव, बल्लारपूर क्षेत्रीय महाप्रबंधक डे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर येथे घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्यात येणार आहे.

मागील सरकारने प्रकल्पग्रस्तांना व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. परंतु आता हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

Web Title: The problem of Sasti, Dhopatala project affected farmers will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.