रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी येण्याचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:05+5:302021-07-30T04:30:05+5:30

भद्रावती : वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा प्रवाह होत असल्यामुळे चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, ...

The problem of water coming under the railway underpass will be solved | रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी येण्याचा प्रश्न मार्गी लागणार

रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी येण्याचा प्रश्न मार्गी लागणार

googlenewsNext

भद्रावती : वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा प्रवाह होत असल्यामुळे चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, चारगाव, पिपरी, कोची, घोनाड यासह १२ गावांचा संपर्क तुटत असतो. अनेकदा दोन ते तीन दिवस गावाला जाणारा रस्ता बंद असल्यामुळे ग्रामस्थांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा लोकहितार्थ प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, सरपंच सुनील मोरे, सदस्य ज्योती मोरे यासह रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वर्धा नदीच्या तिरावर असलेले पिपरी गाव १९९४ रोजी आलेल्या महाकाय पुरामध्ये सापडले होते. आता जास्त पाऊस आल्यामुळे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी साठून राहते. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीकरिता मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गुरुवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मध्य रेल्वेचे सहाय्यक अभियंता नागदेवे यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या. या सूचना लवकर मार्गी काढून हा प्रश्न कायमचा सोडविण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

290721\1428-img-20210729-wa0001.jpg

फोटो

Web Title: The problem of water coming under the railway underpass will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.