पाण्याची समस्या कायमची संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:50 PM2019-01-05T21:50:21+5:302019-01-05T21:50:45+5:30
जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, पांढरकवडा येथील सरपंच रंजना डवरे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा ही ग्रामपंचायत १०० पाणीकर वसुली करणारी व स्मार्ट ग्रामपंचायत ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचाचे कौतुक केले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.
या गावांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले. बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुर्णीचे सरपंच भारती काळे, कातलाबोडीच्या सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफंद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे संतोष डांगे, बेलसनीचे मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे, शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वरगावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले आदींचा समावेश होता.
खनिज निधीचा उपयोग करा
जिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता आहे. यामुळे निधीची उपयोग करून विकासाची कामे पूर्ण करावी. प्रत्येक गावाला आरो मशीन बसवण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे. येत्या काही दिवसांमध्ये सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांशी संवाद साधना दिली.