शाळांच्या समस्या निघणार निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:50+5:302021-09-14T04:32:50+5:30
चंद्रपूर : शाळांतील त्रुटी पूर्तता झालेली फाईल मागील एक महिन्यापासून प्रलंबित आहे. ही फाईल तत्काळ वित्त सचिवांकडे सादर ...
चंद्रपूर : शाळांतील त्रुटी पूर्तता झालेली फाईल मागील एक महिन्यापासून प्रलंबित आहे. ही फाईल तत्काळ वित्त सचिवांकडे सादर करा, २० टक्के अपात्र शाळांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून बंद केले. त्या शाळांचे वेतन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी शासनाने आदेश निर्गमित करावेत तसेच इतर मागण्यांसाठी आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या वेळी शिक्षण सचिव वंदना कृष्णा, वित्त सचिव ओ. पी. गुप्ता यांच्यासह चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, जालना येथील शिक्षक समन्वय संघाचे के. पी. पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून वेळीच समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, दर महिन्यात उशिराने होणारे वेतन, नियमित वेतनासाठी लागणारा आवश्यक निधी वेळेत मंजूर करावा, जिल्ह्यातील प्राप्त तक्रारींवरही चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी बैठकीप्रसंगी दिले.