कृषी समृद्धीच्या प्रक्रियेला मिळाली बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:32+5:30
चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ मध्ये १०३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यांच्या पुढाकाराने चांंदा ते बांदा या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध किसान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक सिंचन विहीर, सामूहिक विहीर दुरूस्ती, सामूहिक कुपनलिका यासह उस्मानाबादी बोकड वाटप, ठिबक सिंचन व आच्छादन योजना, मंडप शेती उच्च भाजीपाला लागवड, पॉलीहाऊस नर्सरी, कृषी अवजारे बँक हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील ४१, पोंभुर्णा तालुक्यातील ३० तर बल्लारपूर तालुक्यातील १७ गावांमधील ५२२ सामूहिक सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून एकूण १३२४ लाभार्थ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे, अशी माहितीमाजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ मध्ये १०३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. सामूहिक विहीर दुरूस्ती योजनेअंतर्गत २५७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ५४१ लाभार्थ्यांना या माध्यमातून सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी १२८.५० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये सदर योजनेची कामे सुरू करण्यात आली असून उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आलेली आहे.
सामूहिक कुपनलिका योजना
सामूहिक कुपनलिका योजनेच्या माध्यमातून २३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ६४ लाभार्थ्यांना या माध्यमातून सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६.०४ लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. जून २०१९ मध्ये सहा कुपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
उस्मानाबादी बोकड वाटप
पशुसंवर्धनाच्या प्रक्रियेला गती प्राप्त व्हावी यादृष्टीने उस्मानाबादी बोकड वाटप योजनेअंतर्गत ३६० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ६६७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३०.८७ लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत १६९ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देण्यात येत आहे.