दूध संकलन खरेदी प्रक्रिया थेट राबविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:17 PM2018-09-03T23:17:58+5:302018-09-03T23:18:17+5:30
येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत संयंत्र सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा होत असलेले दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी आहे. उच्चांकाकरिता योग्य नियोजन, उपाययोजना व उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. दौºयाप्रसंगी दूध संकलन केंद्राची पाहणीही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत संयंत्र सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा होत असलेले दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी आहे. उच्चांकाकरिता योग्य नियोजन, उपाययोजना व उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. दौºयाप्रसंगी दूध संकलन केंद्राची पाहणीही केली.
चंद्रपुरातील दुध डेअरीमध्ये अधिकारी ते चतूर्थश्रेणी श्रेणी असे ७१ कर्मचारी असूनही केवळ पाच हजार लिटर दूध संकलित व वितरीत केल्या जाते. दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते, तरीही तीन ठिकाणची संकलन केंद्र बंद आहेत, अशी माहिती अधिकाºयांनी ना. अहीर व ना. जानकर यांना दिली. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. येथील खरेदी-विक्री व दुधाची गुणवत्ता वाढविणे अतिशय गरजेचे आहे. संकलन खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधितांकडून अहवाल मागवून कार्यवाही करण्याबात ना. अहीर यांनी दुग्धविकास मंत्री जानकर यांच्याशी चर्चा केली. ही दुग्धशाळा अधिकाधिक लोकाभिमुख कशी होईल. दुधाचे उत्पादन ग्राहकांपर्यंत कसे पोहचेल, याबाबत प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विक्री केंद्रात वाढ करण्यासाठी पाच सेंटरची स्थापना करण्याबाबत चर्चा पार पडली. यावेळी पशुसंवर्धन संचालक डॉ. देशपांडे, दुग्ध डेअरीचे अधिकारी निंबाळकर, नगरसेवक राजु अडपेवार, संजय खनके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.