व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज
By admin | Published: September 27, 2016 12:54 AM2016-09-27T00:54:12+5:302016-09-27T00:54:12+5:30
सध्याच्या काळात बेरोजगारीवर मात करायची असेल तर स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेणे ...
मनोहर पाऊणकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : सध्याच्या काळात बेरोजगारीवर मात करायची असेल तर स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेणे व स्वत:चे कौशल्य विकसित करून लघुउद्योजकतेकडे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याने प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केले.
याप्रसंगी विकलांग सेवा संस्थेमार्फत पाऊणकर यांना ग्रंथभेट व पुष्पगुच्छासह स्वागत करण्यात आले. पाऊणकर यांनी विकलांग सेवा संस्थेला कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाला दिलेली साहित्य भेट स्वी कारण्यात आली. कार्यक्रमाला अमित मिश्रा, शितल इटनकर, प्रसाद पान्हेरकर, देवराव कोंडेकर, देवानंद साखरकर आणि श्रीराम पान्हेरकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)