विकास प्रक्रियेत घुग्घूस शहर अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:16 PM2019-01-13T22:16:24+5:302019-01-13T22:17:00+5:30

१९९५ मध्ये मी प्रथम आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो. तेव्हापासून आजतागायत घुग्घूसवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे.

Progress in the development process of the Ghuggus city | विकास प्रक्रियेत घुग्घूस शहर अग्रेसर

विकास प्रक्रियेत घुग्घूस शहर अग्रेसर

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : राज्यस्तरीय क्रीडा सामन्याचा उद्घाटन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १९९५ मध्ये मी प्रथम आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो. तेव्हापासून आजतागायत घुग्घूसवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. शहरातील दहा मोकळया जागांच्या विकासासाठी सहा कोटी रू. निधी मंजूर केला असून चार कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात अत्याधुनिक व सुसज्ज असे स्टेडियम, ग्रामीण रूग्णालयसुध्दा मंजूर करण्यात आले आहे. वर्धा नदीवर २७ कोटी रू. खर्चुन मोठया पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. स्वयंचलित पाणी पुरवठा व सोलार सिस्टीमसाठीसुध्दा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. विकासप्रक्रियेत घुग्घूस शहर अग्रेसर ठरावे, यादृष्टीने आपण सतत प्रयत्नशील आहोत. या शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
घुग्घूस येथे ना. सुधीर मुनगंटीवार चषक क्रीडा सामन्यांच्या उदघाटन सोहळयात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, लॉयड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेंद्रकुमार, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, जिल्हा परिषद सदस्य नितू चौधरी, रणजित सोयाम, मुल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, पंचायत समिती चंद्रपूरच्या सभापती वंदना पिंपळशेंडे, भाजपाचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष नामदेव डाहूले, घुग्घूसचे सरपंच संतोष नुन्हे, पंचायत समिती सदस्य निरीक्षण तांड्रा, ग्राम पंचायत सदस्य वैशाली ढवस, पूजा दुर्गम, सुचित लुटे, सुक्षमा सावे, प्रकाश बोबडे, सिनु इसारप, संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहने, गाव तंटामुक्त अध्यक्ष हसन शेख, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, २५१५ या लेखाशिर्षा अंतर्गत गावातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामासाठी मोठया प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. या क्रीडा स्पर्धांचे आयोजन अतिशय भव्य स्वरूपात करण्यात आले. पुढील वर्षीसुध्दा अशाच पध्दतीचे क्रीडा सामने महोत्सवाच्या स्वरूपात आयोजित करण्यात येतील, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करत जिल्हयाचा झेंडा फडकवला आता मिशन शक्ती अंतर्गत येणाऱ्या आॅलिपींक स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरतील यादृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत. यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सिनेअभिनेते आमीर खान येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
सुधीर मुनगंटीवार समृध्दी योजना या नावाने विविध योजनांची माहिती देणाºया एका कार्डचा शुभारंभ या सोहळयात करण्यात आला. त्यासंबंधीची चित्रफीतसुध्दा दाखविण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांचे भव्य स्वागत करण्यात आले.
विकासकार्याचा प्रवास सुरूच राहणार- भोंगळे
विकासकामे असो वा लोकाभिमुख उपक्रम असो, या सर्वांच्या मुळाशी आमच्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार हेच प्रेरणास्थान आहे. १९९५ पासून या भागाच्या विकासासाठी त्यांनी जे बळ दिले आहे, ते आज मोठया स्वरूपात या परिसराच्या सर्वांगिण विकासाच्या माध्यमातून पुढे येत आहे. त्यांच्या नेतृत्वात विकासकार्याचा हा प्रवास असाच अव्याहतपणे सुरू राहील अशी ग्वाही यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.

Web Title: Progress in the development process of the Ghuggus city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.