गुणवत्ता मंडळामुळे विद्युत केंद्राची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:13 PM2019-02-12T22:13:36+5:302019-02-12T22:13:55+5:30
गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेंद्र गोळे, मानव संसाधन व्यवस्थापनचे विचारवंत उपमुख्य अभियंता अनिल आष्टिक, राजेश राजगडकर राजेश ओस्वाल, विजया बोरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुरेंद्र गोळे यांनी व्यवस्थापन कौशल्य गुणवत्तेवर कशाप्रकारे आधारित आहे,
याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजेंद्र पोइनकर व चमुनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विविध स्पर्धा पार पडल्या. गुणवत्ता मंडळ स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे, सविता फुलझेले व कनिष्ठ अभियंता मुरलीधर गोहणे यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सुरेंद्र निशानराव, संचालन पल्लवी दुर्गे व स्नेहल पाटील तर आभार प्रिती येरेवार व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन श्वेता दासरवार यांनी केले. यावेळी अनिल पुनसे, सुहास जाधव, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुलकर्णी, कार्यकारी अभियंता जयप्रकाश बोवाडे, शालिक खडतकर, भेंडेकर, शितल मेश्राम, कार्यकारी अभियंता हेमंत ढोले, विष्णु पगारे, दिगांबर इंगले, सतीश पाटील, देवराव कोंडेकर, दिलीप कातकर, रोशनी ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंदातील सर्व अधीक्षक अभियंते़, कार्यकारी अभियंते, कर्मचारी व गुणवत्ता मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.