स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:18 PM2019-03-18T23:18:33+5:302019-03-18T23:18:47+5:30
२१ व्या शतकात वावरत असताना स्त्रीने केवळ चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहू नये. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करावे. पुरूषांनी स्त्रीला स्वांतत्र्य दिले तरच समतेचे मुल्य रूजू शकते स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती मिळते. हा विचार काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता सविता फुलझेले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : २१ व्या शतकात वावरत असताना स्त्रीने केवळ चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहू नये. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करावे. पुरूषांनी स्त्रीला स्वांतत्र्य दिले तरच समतेचे मुल्य रूजू शकते स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती मिळते. हा विचार काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता सविता फुलझेले यांनी केले.
श्रीगुरूदेव सेवा महिला मंडळ ऊर्जानगरच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबोधन मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रचारिका शारदा रोडे, उद्घाटक डॉ. संगीता बोदलकर तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या रंजना किनाके, श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष चंदा बावणे आदींंची उपस्थिती होती. कार्यकारी अभियंता फुलझेले यांनी महिला चळवळीच्या विविध पैलुंची माहिती दिली. रोडे यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्यावर भाष्य केले.
डॉ. बोदलकर यांनी श्री गुरूदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रसन्न हसतमुख राहून कुटुंबाकडे लक्ष द्यावे. यातून समाजकार्यालाही वेळ द्यावा. महिला उपास-तापास करून बुवाबाजी अंधश्रद्धेला बळी पडत आहे. महिलांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, याकडे लक्ष वेधले. रंजना किनाके, सुषमा उगे,ज्योत्स्ना लांडे, शितल मेश्राम यांनी महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य, कुटुंबाची जबाबदारी याविषयी विचार मांडले. सुषमा उगे व योगिता कोंडेकर यांनी ‘बसलीस अशी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी’ हे जागृती गीत सादर केले. प्रास्ताविक चंदा बावणे, संचालन वर्षा राऊत यांनी केले. सविता हेडाऊ यांनी आभार मानले. यावेळी ज्योत्सना बावणे, मुक्ता पोईनकर, आशा गाडगे, कमल पिदूरकर, जयश्री बोदडे, कामडे, काळमेघ, नल्लु तुमसरे, ननावरे, जोगी व ऊर्जानगरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.