ऑनलाईन पब्जी मोबाईल गेमला प्रतिबंध घालावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:21+5:30
ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला मारण्याची भावना त्याच्या कोवळ्या मनात निर्माण होत आहे. जीवघेण्या खेळामुळे पालक त्रस्त झाले आहे. विद्यार्थांची अभ्यास करण्याची मानसिकता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : भारतामध्ये पब्जी मोबाईल ऑनलाईन गेम सुरू आहे. यामुळे विद्याथी ऑनलाईन खेळाकडे वळला. देशात दररोज १२ कोटी मुले हा खेळ आठ तास खेळतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करून गुन्हेगारीकडे वळत आहेत असा देशातील नामांकित संस्थांचा निष्कर्ष असल्याने भारतात ऑनलाईन पब्जी मोबाईल गेमला प्रतिबंधित घालण्याची मागणी तालुक्यातील आठ संघटनांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला मारण्याची भावना त्याच्या कोवळ्या मनात निर्माण होत आहे. जीवघेण्या खेळामुळे पालक त्रस्त झाले आहे.
विद्यार्थांची अभ्यास करण्याची मानसिकता नाही. खेळामुळे कुटुंबामध्ये नैराश्याचे वातावरण असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आले. निवेदन देताना युथ इन्स्पायर क्लबचे अध्यक्ष राकेश जीवतोडे, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, शिव साम्राज्य प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समाधान फाउंडेशन, अनुलोम संस्था, नेहरू युवा केद्र, विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, आदिवासी गोंड विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फायदे कमी मात्र नुकसान अधिक
महाराष्ट्रामध्ये पब्जी खेळामुळे जीवघेण्या घटना घडल्या आहेत. या खेळावर बंदी आणावी, यासाठी पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खेळ भारतातील नसून साऊथ कोरियाचा आहे. खेळाचा उद्देश मनोरंजन करणे असला तरी फायदे कमी व नुकसान जास्त असा आरोप विविध संघटनांनी केला आहे.