आंबेडकर भवन प्रिटिंग प्रेस पाडणाऱ्यांचा निषेध
By Admin | Published: June 30, 2016 01:11 AM2016-06-30T01:11:18+5:302016-06-30T01:11:18+5:30
मुंबई दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस भाडोत्री गुंड्यांच्यासाह्याने बुलडोजरने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पाडण्यात आले.
ठाणेदारांना निवेदन: सर्वत्र तीव्र पडसाद
कोठारी : मुंबई दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस भाडोत्री गुंड्यांच्यासाह्याने बुलडोजरने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पाडण्यात आले. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोठारीत भारिप-बमसंच्यावतीने ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना निवेदन सादर करून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनामध्ये घटनेस जबाबदार असणाऱ्या रत्नाकर गायकवाड व त्याच्या ५०० ते ६०० भाडोत्री गुंडाना अटक करा. दादर मुंबई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहा. पोलीस निरीक्षकास तात्काळ निलंबीत करा. पिपल्स इव्युवमेंट ट्रस्ट मध्ये हस्तक्षेप करण्यास मज्जाव करावा. खोटी जाहीरात छापणाऱ्या दै. महानगर संपादकाला अटक करावी. या घटनेची जबाबदारी या मुख्यमंत्र्यांनी स्विकारून पदाचा राजीनामा द्यावा. डॉ. आंबेडकराच्या ऐतिहासिक वास्तुत उद्धवस्त करणाऱ्यांना कडक कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन भारिप बमसं जिल्हा युवक आघाडी महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले . यावेळी उपसरपंच अमोल कातकर, सिद्धार्थ शंभरकर, राहुल रामटेके, निलेश खोब्रागडे, संदीप मावलीकर, सुमित उराडे, फिरोज पठाण, राजु चौधरी, आर.के. जिल्लेवार, आकाश कांबळे, अनिल वनकर, सचिन रामटेके तसेच भरिप बमसंचे कार्यकर्ते तसेच बौद्ध समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)