परिजनांच्या गळाभेटीने गहिवरले बंदीजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:52 PM2017-12-30T23:52:47+5:302017-12-30T23:53:06+5:30

जिल्हा कारागृहाच्या वतीने शिक्षा झालेल्या बंदीवानांसाठी ‘गळा भेट’ उपक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी बंदीवान आपल्या मुला-मुलींची भेट घेवून अक्षरश: गहिवरले.

Prohibition of ghastly by the ghazals of grasshoppers | परिजनांच्या गळाभेटीने गहिवरले बंदीजन

परिजनांच्या गळाभेटीने गहिवरले बंदीजन

Next
ठळक मुद्देचंद्रपूर जिल्हा कारागृह : ‘गळा भेट’ सुधारणा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा कारागृहाच्या वतीने शिक्षा झालेल्या बंदीवानांसाठी ‘गळा भेट’ उपक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी बंदीवान आपल्या मुला-मुलींची भेट घेवून अक्षरश: गहिवरले.
कारागृहातील शिक्षा झालेल्या सर्व बंदीकडून त्यांच्या १६ वर्षांखालील मुला-मुलींची भेट घडवून आणण्यासाठी महिला व बालकल्याण कार्यालयाची मदत घेऊन कारागृहाच्या वतीने जिल्हा परीविक्षाधिन अधिकारी दडमल व बोरीकर यांना कारागृहात आमंत्रित करण्यात आले. गळा भेट कार्यक्रमाकरिता इच्छुक २० बंदीवानांच्या नातेवाईकांचे पत्ते व संर्पक क्रमांक घेवून त्यांना मुला-मुलींची भेट घडवून आणण्याबाबत विनंती करण्यात आली.
इच्छुक बंद्याच्या १२ परिवारांनी गळा भेट कार्यक्रमाला सहमती दर्शविली. शुक्रवारी १२ बंदीजणांच्या १६ वर्षाखालील २१ मुला-मुलींना कारागृहात शिक्षा भोगणाºया आई-वडीलांची भेट करून देण्यात आली.
कारागृहाच्या वतीने कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांनी लहान मुला-मुलींचे कारागृहात स्वागत केले. कारागृहाच्या कर्मचाºयांनी बंदीजणांच्या लहान मुलांना बसवून जेवू घातले.
यावेळी बंदीवानांसोबतच उपस्थितांचे मन गहिवरून आले. या भेटीची संपूर्ण व्यवस्था वरिष्ठ तुरंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केली. यावेळी तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, सुनील वानखडे, नागनाथ खैरे, सुभेदार अशोक मोटघरे, नारायण उमरेडकर, देवाजी फलके, हवालदार जीवन सिंधपूरे आदी उपस्थित होते.

Web Title: Prohibition of ghastly by the ghazals of grasshoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.