हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:11+5:302021-01-08T05:33:11+5:30

चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन ...

Prohibition of hiring scavengers | हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध

Next

चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणीकरिता सल्ला देणे व संनियंत्रण ठेवणे, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधणे यासाठी राज्य नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

सदर समितीमध्ये हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध करणे, पुनर्वसन करणे, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था अथवा समाजाचे प्रतिनिधित्व करीत असणारे राज्याचे रहिवासी अशा चार व्यक्तींचे नामनिर्देशन शासनाने करावयाचे असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश करावयाचा आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी त्यांचा प्रस्ताव कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

Web Title: Prohibition of hiring scavengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.