प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:02 AM2018-04-07T00:02:16+5:302018-04-07T00:02:16+5:30

पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Project affected people get paid on old contract | प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला

प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची मध्यस्थी : पोवनी ३, चिंचोली रिकॉस्टसह सात प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकल्पासंदर्भातील नव्या कायद्यानुसार (एक्स.एल.ए.आर.आर.) मिळणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये वेकोलि प्रशासनाने संभ्रम पसरविला होता. कोणताही वेकोलि अधिकारी याबाबत प्रकल्पग्रस्तांचे समाधान करू शकत नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मोबदल्यासाठीचा संघर्ष कायम होता. प्रकल्पग्रस्तांमध्ये वाढीस लागलेल्या असंतोषाची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गंभीर दखल घेतली.
ज्या प्रकल्पात सी.बी. अ‍ॅक्ट १९५७ अन्वये १४ (१) च्या प्रावधानानुसार जमिनीच्या मोबदल्याबाबत करार कार्यवाही पुर्ण झाली आहे, तसेच ज्या ठिकाणी करारनामे झालेले नाहीत, मात्रा सेक्शन ९ ची अधिसूचना यापूर्वीच लागू झाली आहे, अशा प्रकल्पग्रस्तांवर मोबदल्याबाबत अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन ना. हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले होते. याबाबत ना. अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना प्रति एकरी ६, ८ व १० लाख रूपयांचा मोबदला मान्य करणारे कोळसा मंत्रालयाचे पत्र ३० मार्चला निर्गमित करण्यात आले आहे. कोळसा मंत्रालयाच्या या अध्यादेशामुळे सात प्रकल्पातील शेतकºयांना जुन्या करारानुसारच मोबदल्याची राशी मिळणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी दिली आहे. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासंदर्भातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासूनच संघर्ष थांबला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकल्पग्रस्तांनी केला ना. अहीरांचा सत्कार
या मंत्रालयीन निर्णयामुळे पौनी - ३, चिंचोली रिकॉस्ट या प्रकल्पासह सास्ती यु/जी, निलजई, उकणी अशा एकूण सात प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळाल्याने या सर्व प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी ना. हंसराज अहीर यांचा राजुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी आ. अ‍ॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Project affected people get paid on old contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.