प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:47 PM2019-03-08T22:47:13+5:302019-03-08T22:47:28+5:30

गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती.

Project affected by stoppage of coal | प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक रोखली

प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक रोखली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती.
गोवरी, पोवनी या वेकोलिच्या कोळसा खाणीत कोळसा खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत असल्याने वेकोलिच्या खदानीतील दगड थेट शेतात पडत आहेत. वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून नवीन नाले तयार केले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. परिसरात कोळशाच्या धुळीमुळे आरोग्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे गावकरी संतापले आहेत. दरम्यान, गोवरी, पोवनी, चिंचोली येथील गावकऱ्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूकच आज रोखून धरली. जोपर्यंत वेकोलि प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोवनीचे सब एरिया मॅनेरज सी. पी. सिंग यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्त गावकºयांशी चर्चा केली. वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकाºयांसमक्ष प्रकल्पग्रस्त गावकºयांच्या मागण्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल दोन तास अडवून धरलेली वेकोलिची कोळसा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य सुनील उरकुडे, चिंचोलीचे सरपंच अर्जुन पायपरे, गोवरीच्या सरपंच पोर्णिमा उरकुडे, पोवनीच्या सरपंच सरला फुलझेले, पोलीस पाटील बंडू चिडे, अशोक घोटेकर व गोवरी, पोवनी, चिंचोली येथील प्रकल्पग्रस्त गावकरी उपस्थित होते. यावेळी कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून राजुराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील झुरमुरे ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते.

Web Title: Project affected by stoppage of coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.