प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खनन व वाहतूक बंद पाडली

By admin | Published: April 27, 2017 12:49 AM2017-04-27T00:49:48+5:302017-04-27T00:49:48+5:30

बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत पीनी २ या कोळसा खाण प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नोकरी बहाल करावी,...

Projected workers stopped coal mining and traffic | प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खनन व वाहतूक बंद पाडली

प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खनन व वाहतूक बंद पाडली

Next

वेकोलिचे लाखोंचे नुकसान : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी
चंद्रपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत पीनी २ या कोळसा खाण प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नोकरी बहाल करावी, पीनी- ३ प्रकल्पाकरिता संपादीत होत असलेली अतिक्रमीत जमिनीच्या अतिक्रमणधारकांना आर्थिक मोबदला तसेच आर आर पॉलीसी नुसार देय लाभ मिळावे या व अन्य मागण्यासाठी २१ एप्रिल रोजी भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे यांच्या नेतृत्वात शेकडो प्रकल्पग्रस्तानी पौनी- २ खाणीत कामबंद आंदोलन करुन वेकोलि अधिकाऱ्यांची झोप उडविली.
प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावला अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी वेकोलि प्रबंधनास दिला आहे. या आंदोलनामुळे वेकोलिचे फार मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पौनी- २ या कोळसा खान प्रकल्पामध्ये साखरी व पौनी या दोन्ही गावातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या सुमारे ७७६ एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या प्रकल्पात एकूण २४२ नोकऱ्या मंजूर असतानाही काही प्रकल्पग्रस्तांना नोकरी देवून २२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न वेकोलि अधिकाऱ्यांनी सेक्शन ९ चे कारण सांगत सुडबुधीने केला असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू घरोटे यांनी केला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उर्वरीत सर्व प्रकल्पग्रस्तांना तातडीने नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश दिले असताना तसेच याबाबत वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देशकानी उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेतले जाईल, असे मंत्री महोदयांना आश्वासन देऊनही वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळत असल्याने सुमारे ३०० हून अधिक महिला पुरुष प्रकल्पग्रस्तांनी पौनी खाणीस धडक देत कोळसा उत्खनन व वाहतूक दिवसभरासाठी बंद पाडली.
या आंदोलनांमध्ये सुनील वांढरे मारोती उरकुडे, भाजपा महामंत्री अ‍ॅड. प्रशांत घरोटे, मिलन करदोड, सुरेश काटवले, भिवाजी देठे, पंढरी काटवले, मंगेश उरकुडे, शितल नगराळे, आनंदराव करमनकर, श्रीनिवास दुडम, मारोती काटवले यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. वेकोलिने या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Projected workers stopped coal mining and traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.