युवा अधिकाऱ्यांमुळे विकासाला मिळणार चालना

By admin | Published: January 17, 2017 12:35 AM2017-01-17T00:35:46+5:302017-01-17T00:35:46+5:30

तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते.

Promising youth development will lead to development | युवा अधिकाऱ्यांमुळे विकासाला मिळणार चालना

युवा अधिकाऱ्यांमुळे विकासाला मिळणार चालना

Next

मूल तालुका : एसडीओंपासून मुख्याधिकाऱ्यांपर्यंत युवा अधिकारी
मूल : तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल तालुक्याला युवा अधिकाऱ्यांची ब्रिगेट लाभली आहे. स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन विविध पदावर विराजमान होत विकासाचा ध्यास घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविकच आहे.
उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार राजेश सखदे, संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरवढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे अधिकारी स्पर्धा परीक्षेतून आल्याने सामाजिक, शैक्षणिक व गाव विकासाचा ध्यास असणे स्वाभाविकच आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्याला अधिकाऱ्यांची युग ब्रिगेट लाभली आहे. शहर व गाव विकास साधताना या अधिकाऱ्यांची साथ घेतल्या गेली तर शहर व गाव विकासाला फार मोठे योगदान लाभण्याची शक्यता आहे.
या परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती व्हावी यासाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ते तत्पर असतात. आपण ज्या प्रमाणे प्रयत्न केला, त्याचप्रमाणे गावातील युवक घडावीत. संस्कारी युवापिढी देशासाठी भविष्यकाळ असल्याने त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबरोबरच काम करण्याची जिद्द व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास युवकांना प्रेरणादायी ठरु शकते. शहर व गाव विकास म्हणजे केवळ नाली व रस्ते बांधणे नव्हे तर प्रत्येकांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार निर्मिती हेही महत्वाचे काम आहे.
मूल शहराबरोबरच तालुक्यातील गावात शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यात पाहिजे त्या प्रमाणात स्पर्धा नाही. सामाजिक जाणिवेचा अभाव पदोपदी जाणवतो. यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शहर व गाव विकासाठी कुठलेही राजकारण न आणता अधिकाऱ्यांना सोबत घेतले तर तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सखदे, महसूल विभागाबाबत तत्पर आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे कायद्यात तर संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे गाव व शहर विकासासाठी अग्रक्रमी आहेत. संवर्ग विकास अधिकारी पांढरवळे आजही आपले काम सांभाळून रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत आहेत. त्यात इतरांची भर पडली तर आपल्या भागातील विद्यार्थी सुसंस्कारीत व सक्षम होण्यासाठी मोलाचा हातभार लाभेल. (तालुका प्रतिनिधी)

रोजगार निर्मितीसाठी हातभार लागेल
मूल तालुका रोजगार व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने रोजगारांच्या संधी व शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यास अधिकाऱ्यांची साथ मिळाल्यास मूल शहराबरोबर तालुका देखील रोजगार मुक्त व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल. अधिकाऱ्यांची साथ घ्यायला सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीनी राजकारण न आणता आपल्या गावातील शहरातील युवापिढी सक्षम होण्यास पुढाकार घेतल्यास फायद्याचे ठरेल.

Web Title: Promising youth development will lead to development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.