अंगणवाडी मदतनिसांना पदोन्नती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:17+5:302021-08-22T04:31:17+5:30

दीर्घकाळापासून अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा शासननिर्णयानुसार पात्र मदतनिसांना पदोन्नती देऊन भरावयास पाहिजे. परंतु, त्या भरण्यात आल्या ...

Promote Anganwadi helpers | अंगणवाडी मदतनिसांना पदोन्नती द्या

अंगणवाडी मदतनिसांना पदोन्नती द्या

Next

दीर्घकाळापासून अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा शासननिर्णयानुसार पात्र मदतनिसांना पदोन्नती देऊन भरावयास पाहिजे. परंतु, त्या भरण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक हानी तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासननिर्णयाची अंमलबजावणी करुन सेविकेच्या जागी मदतनिसांना पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी शीला दुर्गे यांनी केली. तर वैशाली कोपुलवार म्हणाल्या, सेविकेच्या रिक्त जागा भरण्यात येत नाही. त्यामुळे अंगणवाडी महिलांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येतो. कार्यभार स्वीकारला नाही तर अधिकारी वर्गातर्फे दबाब तंत्राचा वापर करून अंगणवाडी महिलांना मानसिक त्रास देण्यात येतो, असे त्या म्हणाल्या. आभार कल्पना पात्रीकर यांनी मानले. यावेळी लता वडघणे, मंदा गडकर, रंजू राहुलगडे, किरण दुर्योधन प्रियंका संगीडवार, मंजूषा पेटकर, मीरा कोसरे, अल्का कालेजवार आदी उपस्थित होते.

Web Title: Promote Anganwadi helpers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.