कोरपना तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:48 PM2017-08-28T23:48:21+5:302017-08-28T23:48:39+5:30
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या कोरपना या तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या संबंधित सर्वांगिण विकासासाठी.....
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या कोरपना या तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या संबंधित सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्ध राहून विकास कार्याला चालना देण्यात येईल. येथे भविष्यात विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून येथील क्रीडा प्रेमींना संधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी कोरपना येथे स्कॉलर्स सर्च अॅकेडमीत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्च फाऊंडेशनचे चेअरमन इंजि. दिलीप झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, क्रीडा सहायक प्रमोद वाघाडे, विजय मसे, अरुणा चव्हाण, रविंद्र कुंडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सर्च फाऊंडेशनचे चेअरमन इंजि. दिलीप झाडे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी बोबडे यांनी अतिदुर्गम व मागासलेल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुविधाजन्य शाळेचा दर्जा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष सत्कार केला. या स्पर्धेत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संचालन मनीष दुर्लावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कॉलर्स सर्च अॅकेडेमीचे शारीरिक शिक्षक छगन पेरके, श्याम वाघमारे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.