खावटी अनुदान तातडीने जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:52+5:302021-05-10T04:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सास्ती : राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांकरिता जाहीर केलेली खावटी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने जमा ...

Promptly collect the khawti grant | खावटी अनुदान तातडीने जमा करा

खावटी अनुदान तातडीने जमा करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सास्ती : राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांकरिता जाहीर केलेली खावटी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने जमा करून गरजवंतांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार ॲड. वामनराव चटप व कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रकोप आता ग्रामीण भागातही पसरू लागला असून, आदिवासी गुड्यांवर याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने लावलेल्या लाॅकडाऊनचा जबर फटका जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी वस्त्यांना बसला आहे. कामधंद्यासाठी गावातून बाहेर पडणाऱ्या आदिवासींना आपल्या गावातच बंदिस्त होऊन बसावे लागले असल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे. माणिकगड पहाडावरील कोलाम व जिल्ह्यातील अन्य भागातील आदिवासी बांधवांकडून रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आदिम कोलाम व अन्य आदिवासी कुटुंबांना मोठा फटका सहन करावा लागला. सध्याच्या कोरोना प्रभावाने आदिवासी कुटुंब भयभीत झाली असून, त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने समोर येण्याची गरज आहे. अशा कुटुंबांची तातडीने मदत करता यावी, यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदानाच्या राशीची घोषणा केलेली आहे. मात्र, ही राशी अद्यापही आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेली नसल्याने आदिवासी कुटुंब हवालदिल झाली आहेत. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अपर आयुक्त नागपूर, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर व आदिवासी विकास महामंडळ यांना आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी माजी आमदार वामनराव चटप व विकास कुंभारे यांनी केली आहे.

Web Title: Promptly collect the khawti grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.