योग्य उपचारातून कोरोनाचा धोका टाळणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:56+5:302021-05-16T04:26:56+5:30
कोविड-१९ हा विषाणू एसीई २ नावाच्या रिसेपटरला चिपकतो. आणि शरीरात प्रवेश करतो. एसीई २ हे रिसेपटर शरीराच्यामध्ये फुप्फूस, हृदय, ...
कोविड-१९ हा विषाणू एसीई २ नावाच्या रिसेपटरला चिपकतो. आणि शरीरात प्रवेश करतो. एसीई २ हे रिसेपटर शरीराच्यामध्ये फुप्फूस, हृदय, मेंदू, किडनी, आतळ्या, लिव्हर आणि घशामध्ये असतो. एसीई २ रिसेपटरची मात्रा फुप्फुसामध्ये जास्त असते. त्यामुळे हा विषाणू फुप्फुसाना सगळ्या आधी नष्ट करायला सुरुवात करतो. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी खाली घसरते. परिणामी रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. कोरोनाचे केवळ तीन टक्के रुग्ण गंभीर असतात. परंतु, आपण वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास धोका सहज टाळू शकतो, असेही डॉ. स्वप्नील पुणेकर यांनी सांगितले.
बॉक्स
असा आहे धोका
कोविड-१९मुळे रक्त गोठण्याची क्षमता वाढते व त्यामुळे रक्तवाहिण्यामध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यास. हृदयविकाराचा धोका असतो. मेंदूच्या रक्त वाहिन्या गोठल्यास लकवा मारण्याची शक्यता असते. हात किंवा पायाच्या रक्तवाहिन्या बंद पडल्यास ग्रांगरीन होऊ शकतो. तसेच किडनी आणि लिव्हरसुद्धा काम करणे बंद करतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. अशा गंभीर रुग्णांच्या फिब्रिनोगेन, डी-डिमर, प्रोथ्रोनबिन, सीआरपी आदी चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानी उपचार केल्यास आपण धोका टाळू शकतो.