मालमत्ता कर नोटीसची होळी

By admin | Published: October 28, 2016 12:49 AM2016-10-28T00:49:34+5:302016-10-28T00:49:34+5:30

महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे.

Property tax notice Holi | मालमत्ता कर नोटीसची होळी

मालमत्ता कर नोटीसची होळी

Next

मलोआची भूमिका : सर्वपक्षीय आंदोलन
चंद्रपूर : महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकशाही आघाडीने सर्वपक्षीय धरणे देऊन नागरिकांना पाठविण्यात आलेल्या मालमत्ता कर नोटीसची होळी करण्यात आली.
चंद्रपूर मनपाच्या वाढीव मालमत्ता करवाढीस नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याने ३० मे २०१६ रोजीच्या आमसभेत ठरावाद्वारे २०१६-१७ यावर्षी जुन्या दरानेच कर वसूल करण्याचे ठरले होते. तशा प्रकारची घोषणा तत्कालीन आयुक्त आणि महापौरांनी पत्रपरिषदेत केली होती. धार्मिक स्थळे, सार्वजनिक न्यास, सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सुट दिली पाहिजे होती. आता मनपाने मालमत्ता कराच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्यात मालमत्ता कर प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. तसेच ज्यांना सूट दिली होती, त्यानाही मालमत्ता कराच्या नोटीस दिलेल्या आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. त्यांचा विश्वासघात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्वपक्षीय प्रचंड धरणे आंदोलन करून मनपाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. जुन्या दरानेच कर वसुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मालमत्ता कर मागे घ्यावा आणि पाण्याची जुनी पाईप लाईन बदलण्यात यावी, या मागण्या त्वरीत मंजूर करून त्याची पुर्तता करावी अन्यथा महाराष्ट्र लोकशाही आघाडीद्वारे प्रचंड जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
हे धरणे आंदोलन दिवाकर पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मलोआचे मुख्य निमंत्रक अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रा. नामदेव कन्नाके, प्रा. एस.टी. चिकटे, खुशाल तेलंग, शंकरराव सागोरे, हिराचंद बोरकुटे, शशिकांत देशकर, गोविंद मित्रा, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, इरफान शेख, जहीरभाई काझी, शेख मैकू शहाबुद्दीन, अनवर आलम मिर्झा, रामकुमार आकापल्लीवार, संबाजी वाघमारे, धम्मदीप देवगडे, नामदेव साव, डॉ. अभिलाषाताई गावतुरे, प्रगती भोसले, वैशाली साव, शाहिदा शेख, यशोधरा पोतनवार, शोभाताई बोगावार आदी नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नागरिकांना दूषित पाणीपुरवठा
चंद्रपूर शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या वर असून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ६० वर्षे जुनी असल्यामुळे ती अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे त्यात नालीचे घाण पाणी जाऊन ते दूषित होते. पाण्याच्या टाक्यांवर झाकन व सुरक्षा नसल्याने समाजकंटक कचरा टाकतात. त्यामुळे जनतेला तेच दूषित पाणी प्यावे लागते. परिणामी लोकांना अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. तसेच पाणी अपुरेही मिळत आहे. सदर पाईप लाईन बदलवून जनतेला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळण्याची व्यवस्था करावी., अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

Web Title: Property tax notice Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.