नगर परिषदेने वाढविलेला मालमत्ता कर अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:40+5:302020-12-23T04:24:40+5:30
वरोरा : नगर पालिकेने मालमत्ता करात केलेली वाढ शुक्रवारी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन रद्द करण्यात आला. कोरोनामुळे ...
वरोरा : नगर पालिकेने मालमत्ता करात केलेली वाढ शुक्रवारी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन रद्द करण्यात आला.
कोरोनामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात असतांना नगर पालिकेने या वर्षीपासुन मालमत्ता करात दहा टक्के सरसकट वाढ केली. वसूली विभागात नव्या दराने बिले तयार करन्यात आली. नागरिकांमधे याबाबत संताप व्यक्त केला* जात होता. वरोरा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले यांनी नगराध्यक्ष एहतेशाम अली, विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम , मुख्याधिकारी विजय देवळीकर आदींना निवेदन देऊन मालमत्ता कर वाढ रद्द करन्याची मागणी केली होती. सामान्य जनता कोरोना, लॉकडाउनमुळे त्रस्त असून आर्थिक अडचणीत आहे अशा प्रसंगी करात सूट देन्याएवजी केलेली कर वाढ अन्यायकारक असुन ती तात्काळ रद्द करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा कॉंग्रेसतर्फे देन्यात आला होता. या नंतर नगर पालिकेने तात्काळ सर्वसाधारण सभा बोलविली.शुक्रवारी * * * * * * * * * * * * * * * *वरोरा नगर परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वाढ रद्द करन्याचा निर्णय एकमताने संमत करन्यात आला.कर वाढ रद्द झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.