कंपनीनिर्मिती उद्योगाचा प्रस्ताव

By Admin | Published: May 8, 2017 12:43 AM2017-05-08T00:43:33+5:302017-05-08T00:43:33+5:30

सांसद आदर्श ग्रामातील गावकरी आत्मनिर्भर करण्यासाठी गोपालन व जनावरांच्या संवर्धनासाठी प्रकल्प तयार करण्यात येत आहे.

Proposal of the company-building industry | कंपनीनिर्मिती उद्योगाचा प्रस्ताव

कंपनीनिर्मिती उद्योगाचा प्रस्ताव

googlenewsNext

आदर्शग्राम चंदनखेडा : गावकऱ्यांना येतील सुगीचे दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनखेडा : सांसद आदर्श ग्रामातील गावकरी आत्मनिर्भर करण्यासाठी गोपालन व जनावरांच्या संवर्धनासाठी प्रकल्प तयार करण्यात येत आहे. स्थानिक गावातील उपलब्ध संसाधनाचा वापर करून गावात कंपनी निर्मिती उद्योग उभारणी करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक अनुदान मदतही शासनस्तरावरुन केली जाणार आहे. त्यातून गावाचा चेहरा बदलण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री व खासदार हंसराज अहीर यांनी चंदनखेडा गाव सांसद आदर्शग्राम म्हणून दत्तक घेतल्यानंतर विविध विभागाच्या योजना प्रथम प्राधान्याने चंदनखेडा गावात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील कुटुंबांना या विकास प्रक्रियेत जोडण्याचा ठोस कार्यक्रम राबविण्यात आला नाही. या योजनेच्या माध्यमातून लोकांना जुळविणे व त्यांच्याच सहभागातून गावात आर्थिक प्रगतीचे वारे वाहतील, अशी आशा आहे. उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून लोकसहभागातून विविध उद्योग उभारणीतून गावकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनी उद्योग निर्मितीस ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. नुकतीच राज्य समन्वयक किरण पटवर्धन यांनी चंदनखेडा येथे भेट देवून कंपनी उद्योगाबाबत माहिती दिली.

गावात निर्माण करण्यात येणारा उद्योग
गावाच्या कंपनीची शासनस्तरावर संबंधित विभागाकडून कायदेशीर नोंदणी केली जाणार आहे. या निर्मिती उद्योगात गावातील जवळपास ११०० गायी व जनावरांना गावात एकप्रकारे रात्री एका ठिकाणी एकत्रित ठेवल्या जाईल. दुधाळू गार्इंचे दूध संकलित करून उत्पन्न मिळेल. भाकड जनावरांच्या शेणापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येईल. सोबतच गोमूत्र व शेणापासून लघु उत्पादने निर्माण केले जातील. त्यामध्ये शेतकरी गट व महिला बचत गटाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. गावात शेणापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाला नळयोजनेच्या पाणीपुरवठ्याप्रमाणे पाईपलाईन टाकून केवळ मासिक ३० ते ४० रुपयात बायोगॅस उपलब्ध करण्यात येईल. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंब हे बचत गट असो की, अन्य कोणत्याही यंत्रणेशी नोंदणीकृत जुळणे अपेक्षित आहे.

Web Title: Proposal of the company-building industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.