मुस्लीम बांधवांच्या मागण्यांबाबत निवेदन
By admin | Published: September 22, 2015 01:40 AM2015-09-22T01:40:56+5:302015-09-22T01:40:56+5:30
राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या असलेल्या समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन
बल्लारपूर : राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या असलेल्या समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन बल्लारपूरचे तहसीलदार भोयर यांना दिले.
ईदउल अजह निमीत्त अनुपयोगी बैल आणि वळू यांची कुर्बानी करण्यासाठी तीन दिवस परवानगी द्यावी, मौलाना आझाद मंडळाचे जिल्हावार स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे, या प्रमुख मागण्यांसह बल्लारपूर शहराशी संबंधित, बल्लारपूरला एमआयडीसी स्थापित करावी, चारपदरी रोडवरील अपघातांना आमंत्रण देणारे गढ्ढे बुजवावेत, याही मागण्या निवेदनात आहेत. निवेदन देताना सैय्यद कलीम, बशीर खान, भुरू भाई, म. गयास, सैय्यद अजीज, मुकद्दर खान, अयुब लाला, सैय्यद आसीफ, अब्बास भाई, अब्दुल वसीम, मतीन शेख, इब्राहिम, हमीद, गुलाम फरीद आदी उपस्थित होते. तत्पूर्वी तहसील कार्यालयासमोर धरणा देण्यात आला. या मंडपाला नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. उपाध्यक्ष संपत कोरडे यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)