रखडलेला हुमन प्रकल्प मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:21 PM2019-02-03T23:21:44+5:302019-02-03T23:21:58+5:30

सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ मागील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या हुमन सिंचन प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाला संजिवनी देण्याचे कार्य नागपुरातील जनमंच संस्था करणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. २३ सिंचन प्रकल्पाची शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.

The proposed human project will be completed | रखडलेला हुमन प्रकल्प मार्गी लागणार

रखडलेला हुमन प्रकल्प मार्गी लागणार

googlenewsNext
ठळक मुद्देसिंचन शोधयात्रा दाखल : जनमंच संस्था करणार राज्य शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा: सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ मागील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या हुमन सिंचन प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाला संजिवनी देण्याचे कार्य नागपुरातील जनमंच संस्था करणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. २३ सिंचन प्रकल्पाची शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.
हुमा नदीवर सन १९८२-८३ रोजी हुमन नदीवर हुमन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ३३ कोटी होती. नवरगाव, खांडला भागात कर्मचारी वसाहत तसेच हुमण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्षे काम सुरू असतानाच अचानक बंद झाले. तेव्हापासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागपुरातील जनमंच संस्थेची सिंचन प्रकल्प शोधयात्रा हुमण प्रकल्पाला दाखल झाल्यानंतर सन १९८२-८३ रोजी या परिसरातील शेतकºयांकडून माहिती जाणून घेतली. रत्नापूर येथील रामचंद्र गहाणे, सदाशिव मेश्राम, सरपंच रत्नापूर, उद्धव तोंडफोडे उपसरपंच, रमाकांत लोधे जि. प. सदस्य व अन्य शेतकºयांनी या प्रकल्पाची माहिती दिली. हुमण प्रकल्प सध्या कोणत्या स्थितीत आहे, प्रकल्प का रेंगाळता, पूर्णत्वास का जात नाही, याची कारणे शोधण्यासाठी जनमंच संस्थेने शोधयात्रा सुरू केली. हुमण प्रकल्प पूर्णत्वास जाण्याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती जनमंचाच्या पदाधिकाºयांनी दिली.
सन १९८२-८३ मध्ये ३३ कोटीचा प्रकल्प २५०० कोटीवर पोहोचला. परंतु, शासन उदासिन आहे, असा निष्कर्ष संस्थने पाहणीदरम्यान काढला. २१८ कोटी रूपये आजपर्यंत खर्च करण्यात आले. बुडीत क्षेत्रात ३९ गावे बाधित झाली आहेत. त्यापैकी १५ गावे पूर्णत:, ८ गावे अशंत: आणि १६ गावांची जमीन बाधित झाली. हुमण प्रकल्पाम्मुळे सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा व सावली तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ होणार आहे. सिंचन शोध यात्रेत जनमंच संस्थेचे पदाधिकारी, गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीचे अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, रमाकांत लोधे, जि.प. सदस्य मनोहर खोरगडे, जगताप, एस. सी. धकाते, उपविभागीय अभियंता व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: The proposed human project will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.