पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:51 PM2017-11-14T22:51:28+5:302017-11-14T22:51:39+5:30

माळढोक हा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. जगात मात्र या पक्ष्यांची संख्या अत्यल्प आहे.

Protect the habitat of birds | पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवा

पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवा

Next
ठळक मुद्देपक्षी अभ्यासकांची मागणी : माळढोक पक्ष्यांवर संकट, उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माळढोक हा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. जगात मात्र या पक्ष्यांची संख्या अत्यल्प आहे. माळढोक पक्षांच्या ºहासाचे कारण मागील काही वर्षांपासून नैसर्गिक अधिवासावर मानवी हस्तक्षेप वाढले आहे. माळढोक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने या पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवावा, अशी मागणी पक्षीमित्रांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.
माळढोक हा भारतातील सर्वात मोठा वजनाचा पक्षी आहे. माळढोक नर हा सुमारे १८ ते २० किलोपर्यंत असतो. मोठ्या वजनाचा असूनही माळढोक उत्तमरित्या उडू शकतो. उडण्याआधी तो धावतो. माळढोकला झाडावर बसता येत नाही. त्याच्या चालण्याचा वेग माणसाच्या पूर्णगतीने धावण्यासारखा असतो. मैदानी परिसरात विहार करून किटकांना खावून उदरनिर्वाह करतो. वरोरा- मार्डा-वनोजा परिसरातील माळढोक विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. त्यामुळे वरोरा येथे माळढोकच्या अस्तित्वावर शंका निर्माण झाली आहे.
वरोरा परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर फवारणी होत आहे. त्यासोबतच तणनाशकांचा वापर केल्या जात आहे. रासायनिक विषारी फवारणीमुळे माळढोकला खाद्य मिळेनासे झाले. मिळणारे खाद्यही विषारी रसायनमुक्त असल्यामुळे त्याच्या आरोग्य, प्रजनन व शारीरिक हालचालींवर वाईट परिणाम होत आहे.
अंतिम शिल्लक असलेल्या माळढोकला वाचवण्याकरिता किटकनाशक, तणनाशकची फवारणी थांबवणे गरजेचे आहे. त्यासोबत पिकांमध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे. कापूस, सोयाबिन, तुरी ही पिके माळढोकला अडचणीचे ठरत आहे. त्या एैवजी कठाणी पिके माळढोक परिसरामध्ये घेतल्यास त्याच्या अडचणी कमी होतील. शेतातील विद्युत प्रवाहीत कुंपण, रानडुकरांचा वावरसुद्धा माळढोकसाठी आव्हान ठरत आहे.
त्यासाठी वनविभाग व कृषी विभागाने प्रतिबंधत्मक उपययोजना केली पाहिजे. चंद्रपूर- गडचिरोली सर्पमित्र संघटनेने अधिवास अवलोकन करून काही शेतकरी व शेतमजुरांच्या मुलाखती घेतल्या. या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्यामध्ये जागृती घडविण्यात आली. डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माळढोक अधिवास अभ्यासाचा उपक्रम परिसरात राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे अधिवासाची पाहणी करून माहिती गोळा करण्यात आली.
या उपक्रमात सर्पमित्र प्रवीण कडू वनविभागाचे सारंग भोयर, सर्पमित्र अनुप येरणे, साईनाथ चौधरी, विशाल मोरे, अमोल कुचेकार, ज्ञानेश्वर चौधरी, प्रशांत राऊत, हर्षद घोडीले, इश्वर ठाकरे, धनंजय सदार, श्रीपाद बाकरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protect the habitat of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.